IND vs ENG 3rd ODI News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. एक स्टार ऑलराउंडर जखमी झाल्याने त्याच्या जागी संघात नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे विषय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर दोन्ही संघांमध्ये मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. पहिल्या वनडेत सुंदरने शानदार अर्धशतक ठोकून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना तो जखमी झाला आणि आता त्याला मालिकेला मुकावे लागले आहे.
बीसीसीआयने केली रिप्लेसमेंटची घोषणा
इंग्लंडविरुद्धच्या या निर्णायक सामन्यासाठी बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आणि ऑलराउंडर हर्ष दुबेचा संघात समावेश केला आहे. २३ वर्षांच्या हर्ष दुबेने यापूर्वी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध दोन वनडे सामने खेळले असून, त्यामध्ये ४ फलंदाजांना बाद केले होते. मात्र, त्याला त्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. आता लॉर्ड्सच्या मैदानात त्याला खेळण्याची संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून सविस्तर माहिती दिली आहे. कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वॉशिंग्टनच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. दुखापतीच्या पुढील उपचारासाठी तो लवकरच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दुसऱ्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरू शकला नव्हता.
दरम्यान १९ जुलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या वडनेसाठी टीम इंडिया अशी असणार आहे. शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, गुरनूर बराड़, प्रिंस यादव, हर्ष दुबे .
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा