Jennifer Winget Marriage : सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली असून अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे.जेनिफर आज म्हणजेच १६ जुलै २०२६ रोजी तिचा प्रियकर विल्यम इश्माएल याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे.
जेनिफरचा पती विल्यम इश्माएल हा एक यशस्वी बिझनेसमन आहे. तो सध्या ‘MHC डिजिटल ग्रुप’मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि ट्रेडिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. विल्यमनं ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’मधून इकॉनॉमिक्स आणि फायनान्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानं यापूर्वी ‘युबीएस इन्व्हेस्टमेंट बँक’मध्ये तब्बल १० वर्षे काम केलं आहे. जरी त्याचं काम सिंगापूर आणि यूकेशी संबंधित असलं, तरी तो अत्यंत खाजगी आयुष्य जगणे पसंत करतो.
जेनिफरचे पहिलं लग्न आणि घटस्फोट
जेनिफरचं हे दुसरे लग्न आहे. याआधी २०१२ मध्ये तिनं तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर याच्याशी लग्न केलं होतं. ‘दिल मिल गये’ मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. मात्र, हे नाते फार काळ टिकू शकलं नाही आणि अवघ्या दोन वर्षांत म्हणजेच २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तब्बल १२ वर्षांनंतर जेनिफर आता तिच्या आयुष्यात नवीन सुरुवात करत आहे.
नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत
जेनिफर विंगेटची संपत्ती आणि एपिसोड मानधन
जेनिफर केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बक्कळ कमाईसाठीही ओळखली जाते. जेनिफर विंगेटची एकूण संपत्ती ४५ ते ५८ कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये तिचं मुंबईतील आलिशान घर, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि वैयक्तिक गुंतवणुकीचा समावेश आहे.
जेनिफरचे इन्स्टाग्रामवर १८ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तब्बल १८ ते २५ लाख रुपये आकारते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा