Headlines

Indian Doctor: ‘ते’ मुलांना किडनॅप करतील! डॉक्टर भ्रमात, कुटुंबासह कार 250 फूट दरीत पाडली; 3 वर्षांनी सुटका


Indian Doctor: कुटुंबासह फिरायला गेलेल्या डॉक्टरनं त्याची टेस्ला कार जाणुनबुजून २५० फूट खोल दरीत पाडली. कुटुंबाला संपवण्यासाठी त्यानं कार दरीत पाडली होती. पण आता तोच डॉक्टर निर्दोष सुटला आहे.

us doctor tesla cliff
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: अमेरिकेत तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह टेस्ला कार जाणूनबुजून २५० फूट खोल दरीत पाडणाऱ्या भारतीय डॉक्टरला न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. डॉक्टर धर्मेश पटेलची (४५) सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

डॉक्टर पटेल विरोधात हत्येचा खटला सुरू होता. पण २ वर्षे त्याचं मानसिक समुपदेशन सुरू होतं. समुपदेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानं न्यायालयानं पटेलला दिलासा दिला. पटेलला आरोपमुक्त करण्यात आलं आहे. पटेलनं पत्नी आणि दोन मुलांसह प्रवास करताना त्याची कार दरीत पाडली होती.

नेमकं प्रकरण काय?
२ जानेवारी २०२३ रोजी धर्मेश पटेल त्याची पत्नी आणि दोन मुलांसह कारनं फिरायला गेला होता. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये त्यानं स्वत:ची टेस्ला कार २५० फूट खोल दरीत पाडली. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या उंचीवरुन कार पडल्यानंतरही कारमधील चारही जण वाचले. त्यांना अतिशय किरकोळ जखमा झाल्या. हा एक चमत्कार मानला गेला.

पतीनं जाणुनबुजून कार दरीत पाडल्याचा जबाब धर्मेशच्या पत्नीनं पोलीस चौकशीत दिला होता. यानंतर पोलिसांनी पटेलला अटक केली. हत्येच्या प्रयत्नाचे तीन आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. पण त्यानंतर पतीची भूमिका बदलली. पतीवर खटला चालावा असं वाटत नाही, अशी भूमिका पत्नीनं घेतली आणि संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पटेल यांचं समुपदेशन सुरू झालं. गंभीर स्वरुपाच्या तणावाचा सामना करत असल्याचं पटेलनं मानसोपचारतज्ज्ञांना सांगितलं. अपहरणकर्ते येतील आणि माझ्या मुलांना नेतील. मग त्यांना विकून टाकतील, असा भ्रम पटेलला झाला होता, अशी माहिती समुपदेशनातून समोर आली.

मुलांचं अपहरण होईल या भीतीनं पटेलचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यातूनच त्यानं कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर कॅलिफोर्नियाच्या वैद्यकीय बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेत पटेलला प्रॅक्टिस करण्यास मज्जाव केला होता. जवळपास वर्षभर पटेल तुरुंगात होता.

डॉ. पटेल आरोपमुक्त कसा झाला?
धर्मेश पटेल अतिशय तणावात होता. त्याला गंभीर स्वरुपाचा मानसिक आजार झाल्याचं तज्ज्ञ डॉक्टर मार्क पॅटरसन यांनी २०२४ मध्ये न्यायालयाला सांगितलं. यानंतर न्यायालयानं त्याची तुरुंगातून सुटका केली. मानसिक आरोग्यासाठी आवश्यक उपचार पूर्ण करण्यासाठी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

सॅन मेटो काऊंटीचे डिस्ट्रिक्ट वकील स्टिव्ह वॅगस्टाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायद्यातील तरतुदींमुळे न्यायाधीशांना आरोप हटवावे लागले. कोणी मानसिक आजारामुळे असं केल्यास आणि न्यायालयानं निश्चित केलेले उपचार पूर्ण घेतल्यास २ वर्षांनंतर त्याच्यावरील आरोप हटवले जातात.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा