आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन आणि उद्योजक इक्रम खान यांच्या कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू ठेवलेली वारकऱ्या
.
इक्रम खान यांच्या पुढाकाराने गोल्फ चौक परिसरात वारकरी बांधवांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवाकार्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सहकारीही उत्साहाने सहभागी झाले आहेत.
खान कुटुंबाची ही सेवाभावी परंपरा १९३२ पासून सुरू आहे. इक्रम खान यांचे आजोबा मोसा खान आणि वडील इसा खान यांनी वारकरी सेवा तसेच रामवाडी येथील राम मंदिरात साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवात सातत्याने सहभाग घेत सामाजिक सलोखा जपला. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत इक्रम खान आणि त्यांचे पुत्र अहद इक्रम खान हेही विविध सेवाभावी उपक्रम राबवत आहेत.
धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश खान कुटुंबाच्या या कार्यातून समाजासमोर येत आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत सर्वधर्म समभाव, एकात्मता आणि बंधुभावाची गरज अधोरेखित होत असताना, खान कुटुंबाने जपलेली ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
खान कुटुंबाच्या या नियमित सेवाभावी कार्याचे स्थानिक नागरिक, वारकरी आणि विविध सामाजिक स्तरांतून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य अधिक बळकट होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा…
महापौर मंजुषा नागपुरे यांनी पालखी सोहळ्यांचे केले औक्षण:कळस आणि बोपोडी येथे वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेतला

पुणे शहराने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत केले. आषाढातील रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात लाखो वारकरी पुण्यात दाखल झाले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महापौर नागपुरे यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी महिलांसोबत फुगडी खेळत वारीतील उत्साहात सहभाग घेतला. सविस्तर वाचा…
