Headlines

Arbaz Shaikh | माझ्या बापाला मरताना नाही पाहू शकत…”; अभिनेत्याच्या आक्रोशानंतर तुकाराम मुंढेंचे नोबल हॉस्पिटलवर धाड टाकण्याचे आदेश


 

मुंबई – सैराट या मराठी चित्रपठातील अभिनेता अरबाज शेख सध्या चर्चेत आहे… त्यांने केलेल्या सोशल मिडीयावर एक व्हीडीओ पोस्ट केली आहे.. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.. अरबाजने या व्हिडीओमध्ये सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत.त्याच्या या पोस्टची आता दखल स्वता तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे… हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलचं मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉस्पिटलमधल्या मेडिकलची तपासणी करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेता अरबाज शेख याने सोशल मिडीयावर एक व्हीडीओ जारी केला त्यात त्याने सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत, त्याने म्हणलंय की, नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला अॅडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही पेशंटला तिथे अॅडमिट केलं, तेव्हा सर्वात 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं,

आम्ही ते भरले… त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की, या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की, मी हे बाहेरुन आणू शकतो? तर त्यांनी सांगितलं की, नाही तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या, इंजेक्शन्स घ्यावा लागतील. मी त्यांच्या मेडिकलमधून औषधं घेतली, तर ती सर्व औषधं 40 हजारांहून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यावीत, हा फोर्स होता.

यापूर्वी जेव्हा पप्पांना अॅडमिट केलं, तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरुन आणल्या की, जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचं, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज…

सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलवर धाड

हा व्हीडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झालाये, या व्हीडीओची दखल घेत अन्न आणि औषध तुकाराम मुंढे यांनी या हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.. एफडीएने तातडीने सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलवर धाड टाकली. रुग्णालय परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाला गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमधून तातडीने औषध विक्री थांबवण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत