Crime News: अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या इंजिनीअरच्या पत्नीचा लग्नानंतर ५ महिन्यांनी संशयास्पद शेवट झाला. या प्रकरणाचा तपास अनेक महिने सुरू होता. विशेष म्हणजे या प्रकरणात पतीनंच पोलिसांना कॉल केला होता. पत्नी दार उघडत नसल्याचं त्यानं पोलिसांना कळवलं होतं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अमेरिकेत एका भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. पत्नीला गळा दाबवून संपवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पत्नीला संपवल्यावर त्यानं तिच्या शवाचा फोटो काढून तो भारतात राहणाऱ्या प्रेयसीला पाठवला. या प्रकरणाचा तपास ९ महिने चालला. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला जामिनासाठी ५० लाख डॉलर म्हणजेच जवळपास ४७ कोटी रुपये मोजावे लागतील. दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
अविनाश नरणे असं आरोपीचं नाव आहे. ३० वर्षांचा अविनाश मूळचा तेलंगणाचा रहिवासी आहे. तो अमेरिकेत सॉफ्टवेअर अभियंता आहे. त्याचा विवाह ५ जून २०२५ रोजी राजिता सब्बिनेनी सोबत झाला होता. २७ सप्टेंबर २०२५ रोजी अविनाशनं पोलिसांना फोन केला. पत्नी बाथरुमध्ये असून ती दार उघडत नाहीए, अशी माहिती अविनाशनं पोलिसांना दिली. पोलिसांनी घरी घेऊन बाथरुमचं दार तोडलं. तेव्हा आता राजिताचं शव सापडलं. मी ४० मिनिटं घराबाहेर होतो. घरी परतलो तेव्हा पत्नी बाथरुममध्ये असल्याचं लक्षात आलं, असं अविनाशनं पोलिसांना सांगितलं. Avinash Narne : कफ सिरप घातलेली स्मूदी, प्रेयसीला चार फोन; पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश नरणे गोत्यात पोलिसांनी अपार्टमेंटमधील स्मार्ट लॉक आणि सुरक्षा यंत्रणा तपासून पाहिली. अविनाश बाहेर असताना घरात अन्य कोणीही आलं नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे यामध्ये बाहेरील व्यक्तीचा संबंध नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. शवविच्छेदन अहवालातून राजिताचा शेवट श्वास गुदमरल्यानं झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण हत्येचं मानून पुढील तपास सुरू केला.
अविनाशचे भारतात राहणाऱ्या एका तरुणीशी अनेक वर्षांपासून प्रेम संबंध असल्याचं तपासातून स्पष्ट झालं. प्रेयसीशी संबंध असताना त्यानं राजिताशी अरेंज मॅरेज केलं. या लग्नाला त्याची प्रेयसीदेखील उपस्थित होती. लग्नानंतरही दोघे सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात होते. ज्या दिवशी राजिताची हत्या झाली, त्या दिवशी अविनाश त्याच्या प्रेयसीशी किमान चार वेळा बोलला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी त्यानं राजिताच्या पार्थिवाचा फोटो प्रेयसीला पाठवला होता. Indian Doctor: ‘ते’ मुलांना किडनॅप करतील! डॉक्टर भ्रमात, कुटुंबासह कार 250 फूट दरीत पाडली; 3 वर्षांनी सुटका पोलीस तपासात राजिता आणि अविनाश यांचं चॅट समोर आलं. त्यात राजितानं अनेकदा पतीनं तयार केलेल्या ड्रिंकची चव कडू असल्याची तक्रार केली होती. पतीनं तयार केलेल्या स्मूदीची चव औषध आणि कफ सिरपसारखी होती, असं राजितानं मृत्यूच्या दिवशी केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं होतं.
पत्नीची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे तिनं कफ सिरप घेतलं असावं आणि त्यानंतर ती बाथरुममध्ये पडली असावी, अशी शक्यता अविनाशनं पोलिसांकडे बोलून दाखवली होती. राजिताच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अनेक महिने डिजिटल रेकॉर्ड, कॉल डिटेल आणि अन्य पुरावे गोळा केले. यानंतर जुलै २०२६ मध्ये अविनाशची पुन्हा चौकशी करण्यात आली. चौकशी संपताच त्याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा