मुंबई : इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात महिला भारतीय संघाने २७० धावांनी धावांनी विजय मिळवला आहे. सुरुवातीपासूनच इंग्लंडवर वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाने अखेरच्या म्हणजेच चौथ्या दिवशी अवघड दीड तासात इंग्लंडला ऑल आऊट करत विजय साकारला. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर १४२ वर्षानंतर पहिल्यांदाच झालेल्या एकमेव सामन्यात भारताच्या वाघिणींनी इंग्लंड संघाची शिकर करत इतिहास रचला. या सामन्यामध्ये २२ वर्षीय क्रांती गौडने दोन डावात ७ विकेट आणि यास्तिका भाटियाची शतकी खेळी सर्वांच्या लक्षात राहणारी असेल.
भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये २८५ धावा केल्या होत्या. यामध्ये स्मृती मंधाना ८५ धावा, हरमनप्रीत कौर ५८ धावा आणि दीप्ती शर्माने ५७ धावा केलेल्या. या तिघींच्या अर्धशतकी खेळीने भारताने जवळपास ३०० धावांच्या आसपास मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडला अवघ्या १७० धावांवर ऑल आऊट करत भारताने आघाडी घेतली होती. पहिल्या डावात क्रांती गौड हिने पाच विकेट नावावर केल्या होत्या. या आघाडीनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने ३४१-७ धावांवर डाव घोषित केला आणि विजयासाठी ४५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. Stephen Fleming : IPLमधील धोनीसोबतचा मास्टरमाइंड स्टीफन फ्लेमिंगने 18 वर्षांचा प्रवास थांबवला; संघाच्या मालकांकडूनही कौतुक दुसऱ्या डावामध्ये स्मृती मानधनाने ७० धावा केल्या होत्या. यास्तिका भाटिया हिने १५८ चेंडूत ११३ धावा करत लॉर्ड्स मैदानावर पहिले शतक ठरणारी जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर रिचा घोषने ५० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा २०० धावांचा टप्पाही पार करून दिला नाही. इंग्लंडला १८६ धावांवर ऑल आऊट करत विजय मिळवला. इंग्लंडकडून एमी जोन्स ५४ धावा, सोफी एक्लेस्टोनन ५० धावा करत झुंज दिली होती पण अखेर भारतीय गोलंदाजांनी विजय मिळवलाच. भारताकडून या सामन्यात स्नेह राणाने ४ विकेट घेतल्या होत्या. तर क्रांती गौड २ विकेट, सायली सातघरे २ विकेट आणि दीप्ती शर्माने २ विकेट घेतल्या. Rahul Dravid Coach : इंग्लंडच्या कोचपदावरून ब्रेंडन मॅकलमला हटवलं, राहुल द्रविडची लागणार वर्णी? ‘द वॉल’ रेसमध्ये प्रबळ दावेदार, आणखी कोण? भारतीय महिला संघ (प्लेइंग 11): स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (C), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (WK), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायली सतघरे, श्री चरणी, क्रांती गौड
इंग्लंड महिला संघ (प्लेइंग 11): टॅमी ब्यूमंट, माया बुशियर, हेदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट (C), ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स (WK), मॅडी व्हिलियर्स, सोफी एक्लेस्टोन, इझी वोंग, लॉरेन बेल, लॉरेन फायलर
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा