Headlines

हिंदुत्ववादी डॉन, बाबा फरजान यांच्या घरावरील छापेमारीवर दानवे- शिरसाटांचा आक्षेप – sanjay shirsat and ambadas danve question baba farzan bungalow raid


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव भागात ९० च्या दशकातील ‘डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा फरजान याच्या बंगल्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महिनाभरापूर्वीच निधन झालेल्या बाबा फरजान यांच्या घरावर १० जुलैच्या मध्यरात्री झालेली ही कारवाई, तिथून जप्त करण्यात आलेला अफाट शस्त्रसाठा आणि कोट्यवधींची रोकड यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कारवाईत जे काही पोलिसांच्या हाती लागलंय, ते पाहून कोणाचेही डोळे पांढरे होतील. पण या कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगरमधील राजकारण कमालीचं तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते, जे कधीच एकमेकांसोबत सहमत नसतात, ते या प्रकरणात पोलिसांच्याच भूमिकेवर संशय व्यक्त करत एकत्र आले आहेत. एरवी एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे या मुद्द्यावर पहिल्यांदाच एका सुरात बोलताना दिसत आहेत. संजय शिरसाट यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत, तर अंबादास दानवे यांनीही शिरसाट यांच्या सुरात सूर मिसळला आहे. बाबा फरजान नक्की कोण होता? त्याच्या घरावर झालेल्या कारवाईत काय सापडलं? आणि ही कारवाई अचानक वादाच्या भोवऱ्यात का सापडली आहे? तेच या व्हिडिओतून समजून घेऊया…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत