Headlines

illegal gas cylinder stock seized from bhandara gondia yavatmal district ; यवतमाळमध्ये गॅसची साठेबाजी! एकाच घरातून 40 सिलिंडर जप्त; भंडारा, गोंदियातही कारवाई


Gas Cylinder Black Market Busted In Yavatmal: भरारी पथकांने कारवाई करत भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यातून कायदेशीर साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.

lpg gas cylinder
एलपीजी गॅस सिलिंडर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
यवतमाळ : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची संधी साधून त्याची बेकायदेशीर साठवणूक सुरू करण्यात आली आहे. भरारी पथकांनी भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये छापा टाकून सिलिंडर जप्त केले. या प्रकरणात एकाला अटकही करण्यात आली आहे.

भंडारा जिल्हा पुरवठा विभागाने एका विशेष मोहिमेंतर्गत छापा टाकून बेकायदेशीर साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. पहिली कारवाई भंडारा शहरातील राजीव गांधी चौक परिसरात करण्यात आली. या ठिकाणी एचपीसीएल कंपनीचे चार घरगुती गॅस सिलिंडर बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचे आढळले. दुकान मालक नरेश श्रावण माकडे याच्याकडे सिलिंडरबाबत कोणतेही वैध कागदपत्रे किवा खरेदी पावती उपलब्ध नव्हती.

Maharashtra TimesCrime News : मुलगी नको, घरातच गर्भपाताचं रॅकेट, पोटच्या गोळ्याला पोटातच संपवलं, छ.संभाजीनगरमधील घटना उघड
प्रशासनाने हे चारही सिलिंडर घटनास्थळावरून जप्त केले आहेत. दुसरी कारवाई दवडीपार येथील सीएससी सेंटरवर करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या केंद्राची तपासणी केली असता, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संदेश आणि मंगेश विलास रामटेके हे एकाच ठिकाणाहून दोन सेंटर्स चालवत होते. गोंदिया जिल्ह्यात १७ सिलिंडर जप्त करून एकाला अटक केली आहे.

Maharashtra TimesBhandara Crime: विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन; संतप्त गावकऱ्यांचा शिक्षकाला चोप, ZP शाळेतील प्रकार
पुसदमध्ये धडक कारवाई
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये एका घरातून ४० गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. एका घरात या सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. याविषयीची माहिती मिळताच भरारी पथकाने पुसदमधील नूर कॉलनीतील सुभाष वॉर्ड येथील आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरावर छापा टाकाला. त्यांना सिलिंडरचा मोठा साठा एका खोलीत ठेवल्याचे आढळून आले. पुसद पोलिसांनी अरिफ कच्ची याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमाखाली गुन्हे दाखल करून अटक केली आहे. आरोपीने हे सिलिंडर कुठून आणले त्याची चौकशी पोलिस करीत आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा