TMC Water Cut: ठाणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पाणीकपात सुरू केला आहे. या आठवड्यात दिवा, मुंब्रा, कळव्यासह अनेक भागांमध्ये 48 तासांसाठी पाणी पुरवठा होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे: शहरात सध्या पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीकपात करण्यात येत आहे. पुण्यामध्ये तर 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात एलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे या वर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाण पाणीकपात करण्याच निर्णय घेण्यात येणार आहे.
कधीपासून पाणीपुरवठा बंद राहणार?
जलसंपदा विभागाबरोबर 19 जून रोजी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या होत्या. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ व शहाड जलशुद्धीकरण केंद्र शहाड येथून होणारा पाणीपुरवठा मंगळवार 23 जून रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून ते गुरूवार दिनांक 25 जून रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत म्हणजेच एकूण 48 तास बंद राहील.
या शटडाऊनचा परिणाम ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांवर होणार आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी 48 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
पाणीपुरवठा पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर पुढील काही दिवस कमी दाबाने पुरवठा होईल अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे. या 48 तासांदरम्यान पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
शिवाय कल्याण तालुक्यातील बारवी, शहाड आणि अंबरनाथमध्ये बुधावरी रात्री 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 12वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये म्हणून 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत दर आठवड्याला पालिकेच्या हद्दीतील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा