Headlines

Hingoli Parbhani Nanded Earthquake Collector Rahul Gupta urges not to panic; हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; दोन तासात चार वेळा धरणीकंपाची पहिलीच वेळ


Marathwada Earthquake : मध्यरात्री ०१:३७ ते ०३:२३ या दोन तासांमध्ये भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवले. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ तथा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवासजी औंधकर यांनी दिली.

Hingoli Parbhani Nanded Earthquake Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हिंगोली : हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी मध्यरात्री भूकंपाचे एकामागून एक चार सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्री 01:37, 02:15, 02:17 आणि 3.23 वाजताचा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे 4.6, 3.6, 3.9 व 4.1 अशी नोंदवण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी या गावात असून सुदैवाने या धक्क्यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.

भूकंपाचे धक्के बसले तेव्हा बहुतांश जण झोपेत होते. एकापाठोपाठ एक असे दोन धक्के जाणवले असल्यामुळे सकाळपर्यंत अजून धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भूकंपाची पूर्वकल्पना देणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे. भूकंपाचे धक्के जाणवताच घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंगोली- नांदेड- परभणी या भागात अनेक नागरिकांनी हा अनुभव घेतला. पहिला धक्का हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे शिरळी या गावात याचे भूकंप केंद्र होते, यावेळेस भूकंप खोली १० किलोमीटर होती. तर दुसरे दोनही धक्के पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम- उत्तरेकडील काकडधाबा गावात यांचे केंद्र होते. यांची खोली १० किलोमीटर नोंदली गेली.

एकाच वेळी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी व वसमत तालुक्यात गेल्या सहा वर्षांत ३७ पेक्षा जास्त सौम्य भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. आज मध्यरात्री ०१:३७ ते ०३:२३ या दोन तासांमध्ये चार सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. एकाच दिवशी चार धक्के बसण्याची ही पहिलीच वेळ आहे अशी माहिती ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ तथा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवासजी औंधकर यांनी दिली.
Maharashtra TimesAvinash Narne : कफ सिरप घातलेली स्मूदी, प्रेयसीला चार फोन; पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश नरणे गोत्यात
पहिला धक्का आज मध्यरात्री १.३७ वाजता,
४.६ रिश्टर स्केल,
शिरळी -पांग्रा शिंदे गाव
खोली १० किलोमीटर.

दुसरा धक्का पहाटे मध्यरात्री २.१५ वाजता,
३.६ रिश्टर स्केल,
काकडधाबा गाव,
खोली १० किलोमीटर.

तिसरा धक्का मध्यरात्री २.१७ वाजता,
३.९ रिश्टर स्केल,
काकडधाबा गाव,
खोली १० किलोमीटर.

चौथा धक्का पहाटे ३.२३ मिनिटांनी
४.१ रिश्टर स्केल,
काकडधाबा गाव
खोली १० किलोमीटर.

देशात El Nino चा इशारा असतानाही Maharashtra मध्ये मुसळधार पाऊस कसा? काय म्हणाला शेतकरी?

नागरिकांनी भूकंपाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुका परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

जिल्ह्यात आज सकाळी ३ वाजेनंतर भूकंपाचे धक्के जाणवले असून, भूकंपासंदर्भातील कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर अथवा समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती केवळ जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि शासनाच्या अधिकृत माध्यमांतूनच प्राप्त करावी. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अथवा नुकसान आढळल्यास तत्काळ स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी केले आहे.
Maharashtra TimesEknath Khadse : महाजनांचा प्रभाव घटवण्यासाठी केंद्राची नवी चाल? तावडेंशी भेट, घरवापसीच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात…
तसेच, समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारच्या अफवा किंवा दिशाभूल करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे अथवा पुढे पाठविणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा