Headlines

Vanchit Bahujan Aghadi Leader DR Dilip Maske Joins NCP Party in Hingoli


वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दिलीप मस्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळमनुरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काही सरपंच, उपनगराध्यक्षांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे अजित पवार गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

hingoli news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गजानन पवार, हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष असलेले डॉ. दिलीप मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी काही हिंगोली वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यानंतर ते कोणत्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार‌? याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी मुंबईत आपल्या पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे कळमनुरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षाला देखील मोठा धक्का बसला आहे. डॉ. दिलीप तातेराव मस्के हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पारडी येथील आहे. त्यांनी 2019 यावर्षी आपल्या वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केले. त्यांनी तब्बल 100 गावांमध्ये गाव तिथे शाखा असा उपक्रम राबवला. पक्षाला मोठ्या प्रमाणात संघटना वाढवण्यास मदत केली. याच कामाची पोचपावती म्हणून त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली होती.

कळमनुरीमध्ये विद्यमान आमदारांना तगडे आव्हान देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून दिलीप मस्के यांना उमेदवारी दिली होती. दिलीप मस्के यांच्या कार्यामुळे मागील सात वर्षात वंचित बहुजन आघाडी पक्षाला मोठी मदत झाली.
जनतेची कामे आपल्याला सरकारच्या माध्यमातून करता यावी याकरता त्यांनी मागील महिन्यात पक्ष आणि पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे कळमनुरी विधानसभा क्षेत्रात अजित पवार राष्ट्रवादीला चांगले दिवस येणार असल्याचे सध्या बोललं जातंय.

पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गरजे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे, जिल्हाध्यक्ष बिडी बांगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, दिलीप मस्के यांच्यासह उबाठा शिवसेनेचे दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख कैलास खिलारे, वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अफजल शेख, कळमनुरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव पतंगे, त्याचबरोबर मसोड येथील सरपंच उत्तमराव कुरवाडे, काँग्रेसचे अच्युत पतंगे, कळमनुरीचे माजी उपनगराध्यक्ष पठाण आयुब खान, शेख आयुब, सलीम कुरेशी, मामूद अश्रफी यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा