Headlines

Hingoli Maratha Protestant Gopinath Jadhav dies after falling from running Train after Maratha Reservation Manoj Jarange Patil; मनोज जरांगे पाटील यांच्या सभा-बैठकांना हजेरी, मराठा आरक्षण मिळाल्याच्या आनंदात घरी निघाले, पण नियतीने डाव साधला, चटका लावणारा अंत


Maratha Reservation Protestant Death : आझाद मैदानावरुन रेल्वेने वाशीकडे परतत असताना सानपाडा स्थानकाजवळ गर्दीत रेल्वेतून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती

Hingoli Maratha Andolak Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गजानन पवार, हिंगोली : आरक्षण मिळाल्यानंतर आनंदाच्या भरात हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा आंदोलक मुंबईवरुन गावाकडे परत येत असताना भीषण अपघात झाला. रेल्वेतून खाली पडल्यामुळे आंदोलकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोराळा गावात आज दुःखद वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील बोराळा येथील 50 वर्षीय गोपीनाथ सोनाजी जाधव हे आझाद मैदानावरील मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या बैठका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सभांनाही त्यांचा सक्रिय सहभाग राहत होता.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी 27 ऑगस्ट रोजी बोराळा गावातून तब्बल वीसपेक्षा अधिक आंदोलक वाहनाने मुंबईला आलेले होते. वाशी येथील पार्किंगला गाडी लावून ते आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी झाले होते.

ट्रेनमधून पडून गंभीर जखमी

दरम्यान सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार जीआर जारी केला, मराठा आरक्षण मिळालेल्या आनंदात विजयी रॅलीत आनंदाने सहभागी झाल्यानंतर आझाद मैदानावरुन रेल्वेने वाशीकडे परतत असताना सानपाडा स्थानकाजवळ गर्दीत रेल्वेतून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने सोबतच्या आंदोलकांनी जाधवांना तातडीने उपचारासाठी के.ई.एम. रुग्णालयात दाखल केले होते.
Maharashtra TimesNilesh Rane : कोकणातील सहा नेत्यांचं भाजपातून निलंबन, निलेश राणे खवळले, म्हणाले राणे साहेब ज्या दिवशी…
दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूला दुखापत झाली असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र उपचारादरम्यान त्यांचा यामध्ये मृत्यू झाला.

Asim Sarode | जरांगे युद्धात जिंकले, तहात हरले? मराठा बांधवांची फसवणूक? असीम सरोदेंनी सांगून टाकलं

Maharashtra TimesAjit Pawar Viral Video : तुम्हारी इतनी हिम्मत… अजित दादांनी ज्यांच्यासाठी महिला IPS Anjana Krishna अधिकाऱ्याला झापलं, त्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा, कारण ठरलं…
या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे बोराळा गावी आणला. शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मयत गोपीनाथ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा