Headlines

निरावी चहात ‘सपट’ नकोच! 121 वर्षांचा वारसा, ‘ट्रेडमार्क’बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय – mumbai hc ruling regarding trademark rights of renowned sapat company known for its tea for 121 years


म. टा. प्रतिनिधी, नाशिक: तब्बल १२१ वर्षांपासून चहाचा वारसा असलेल्या सुप्रसिद्ध ‘सपट’ कंपनीच्या ‘ट्रेडमार्क’ अधिकारांवरून दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्व निर्णय दिला आहे. चहा व्यवसायात ‘सपट’ या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा गैरवापर केला जात असल्याचे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने ‘निरावी कन्झ्युमर एलएलपी’ आणि तिच्या भागीदारांना व्यवसायात, पॅकेजिंगवर किंवा दुकानावरील बोर्ड्सवर ‘सपट’ हे नाव वापरण्यास मनाई केली आहे.

न्यायाधीश शर्मिला देशमुख यांनी या प्रकरणात निकाल दिला आहे. सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत ‘निरावी कन्झ्युमर एलएलपी, सपट अँड कंपनी नाशिक व इतर’ यांच्याविरुद्ध याचिका दाखल होती. ‘सपट’मार्फत ज्येष्ठ विधिज्ज्ञ बिरेन्द्र सराफ यांनी युक्तिवाद केला. यासह वकील हिरेन कमोद, प्रवर शर्मा, सुचिता चव्हाण यांनी ‘सपट’ची बाजू मांडली.

Maharashtra TimesChhagan Bhujbal: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
‘निरावी’मार्फत वकील अलंकार किरपेकर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयीन आदेशानुसार, ‘निरावी’, त्यांचे भागीदार किंवा मध्यस्थी यांना चहाच्या उत्पादनात, पॅकेजिंगमध्ये, विक्रीत, जाहिरातीत किंवा दुकानांच्या साइनबोर्डवर ‘सपट’ नाव अथवा साम्य असणारे कोणतेही नाव वापरण्यास पूर्णतः बंदी आहे. प्रतिवादींच्या विनंतीवरून वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयाने संबंधित मनाई आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. या निकालामुळे ‘कॉर्पोरेट जगतात आणि ’ब्रँड’ विश्वात ट्रेडमार्क नोंदणी आणि ‘कौटुंबिक करारांचे’ महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

नेमके प्रकरण काय?
रामाशंकर हरिभाई जोशी यांनी ‘सपट’ व्यवसायाची सुरुवात सन १८९७ मध्ये केली होती. सन १९०५ मध्ये चहाची विक्री व सन १९५७ मध्ये वर्ग ३० (चहा) अंतर्गत ‘सपट’ ट्रेडमार्कची नोंदणी झाली. सन १९९५ मधील कौटुंबिक वाटाघाटी आणि करारांनुसार चहाचा व्यवसाय आणि वर्ग ३० मधील ‘ट्रेडमार्क’चे सर्व हक्क ‘सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीकडे हस्तांतरित झाले. तर हेल्थकेअर व्यवसाय ‘ सपट ग्लोबल हेल्थ ’कडे वर्ग झाला. जून २०२४ पर्यंत प्रतिवादी कंपनी (निरावी कन्झ्युमर) ही ‘सपट इंटरनॅशनल’ चहा खरेदी करून विकत होती. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे जून २०२४ मध्ये याचिकाकर्त्यांनी प्रतिवादींना चहाचा पुरवठा बंद केला.

Maharashtra TimesCJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली
न्यायालयाचे निष्कर्ष…
-ट्रेडमार्क कायदा सन १९९९ च्या कलम २८ व २९ नुसार वर्ग ३० (चहा) साठी ‘सपट’ या नावाचे, चिन्हाचे सर्व कायदेशीर हक्क केवळ याचिकाकत्यांकडे आहेत
-सन १९९५ मधील हस्तांतरण कराराद्वारे हक्क सोडून दिल्यानंतर हस्तांतरक किंवा त्यांच्या नातेवाईकांना ‘आम्ही जुने वापरकर्ते आहोत’ असा दावा करण्याचा कायदेशीर अधिकार उरत नाही
-दुकानावरील किंवा बोर्डवरील ‘सपट’ नाव पाहून ग्राहक दुकानात आकर्षित होतो. जरी ‘निरावी’ चहा विकला जात असला, तरी ग्राहकाच्या मनात सुरुवातीला निर्माण होणारा भ्रम हा कायद्यानुसार ट्रेडमार्कचे उल्लंघन आणि ‘पासिंग ऑफ’ ठरतो.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत