Gulabrao Patil on Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे फार काही बोलत नाहीत, त्यांनी फक्त आपल्या दाढीवर हात फिरवला की ‘ऑपरेशन टायगर ३.०’ यशस्वी होईल,’ असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : ‘ऑपरेशन टायगर २.०’ अंतर्गत शिवसेना उबाठा पक्षाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता ‘ऑपरेशन टायगर ३.०’ सज्ज आहे. यात त्यांचे तब्बल १४ हून अधिक आमदार शिवसेनेत दाखल होतील, असा खळबळजनक दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी केला.
ठाकरेंचे १४ आमदार फुटणार?
‘खासदार तर फक्त सुरुवात होती, आता मुख्य पिक्चर बाकी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फार काही बोलत नाहीत, त्यांनी फक्त आपल्या दाढीवर हात फिरवला की ‘ऑपरेशन टायगर ३.०’ यशस्वी होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय दिना पाटील यांच्यावर आपल्या पहाडी शैलीत निशाणा साधला.
मुलाला जमत नाही, बापाने बाहेर पडावं
फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या दौऱ्यांवर बोलताना गुलाबराव म्हणाले, ‘राजकारणात दौरे केलेच पाहिजेत, त्याशिवाय काम होत नाही; पण आता मुलाला जमत नाही, म्हणून बिचाऱ्या बापाने तरी बाहेर पडायला हवे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मैदानात उतरून काम करणारा आणि सतत जनतेत फिरणारा नेता म्हणून आज शिंदेंचे नाव आहे. ते लाडक्या बहिणींच्या, शेतकऱ्यांच्या आणि वारकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
VIDEO | गुलाबराव पाटलांकडून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची खिल्ली
‘आता काय फायदा?’
दुसरीकडे, ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असता, तर आज पक्षावर ही वेळ आली नसती आणि त्याचे चांगले परिणाम दिसले असते. आता सगळे सोडून गेल्यानंतर फिरून काय साध्य होणार? त्यांच्या विदर्भ दौऱ्याचा कोणताही परिणाम होणार नाही,’ अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. Medha Kulkarni : ताईंचा गैरसमज झाला, मेधा कुलकर्णींच्या आरोपांवर अभिमन्यू पवारांचं उत्तर, जाहीर दिलगिरी मांडतो, पण कार्यक्रम सोडणं वैयक्तिक विषय सामंत शुक्रवारी अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आगामी काळात शिवसेनेत प्रवेश केलेले सर्व सहाही खासदार शंभर टक्के निवडून येतील, असा दावाही सामंत यांनी या वेळी केला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा