Headlines

Goshta Ajun Sampleli Nahi Marathi Horror Natak ; मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच अंगावर काटा आणणारा प्रयोग, 360 डिग्रीत सादरीकरण! दाटलेल्या अंधारात संशयाची सावली- गोष्ट अजून संपलेली नाही


New Marathi Horror Natak : मराठी नाट्यभूमीवर एक आगाळावेगळा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये प्रेक्षकांना नाटकाच्या सादरीकरणाची अनुभूती ही केवळ मंचावरच नव्हे तर अगदी 360 डिग्री कानाकोपऱ्यातून घेता येणार आहे.

goshta ajun sampleli nahi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठी रंगभूमीवर नाटकांमार्फत वेगवेगळे प्रयोग सादर होत असतात. प्रेक्षकही ते अगदी मोहित होऊन पाहतात. सध्या अशाच एका नाटकाची सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. ते म्हणजे ‘ नाट्यप्रभा निर्मिती ‘ प्रस्तुत ‘गोष्ट अजून संपली नाही’. नाटकाचं नाव वाचूनच मनात एक प्रकारे गूढ धाकधूक सुरू होते; आणि जेव्हा प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात होते, तेव्हा प्रेक्षक एका वेगळ्याच विश्वात जातात. आजवर मराठी रंगभूमीवर न पाहिलेला आणि न अनुभवलेला एक थक्क करणारा प्रवास म्हणजे हे नाटक आहे असे नक्कीच म्हणता येईल.

या नाटकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची निर्मिती संकल्पना. मराठी रंगभूमीवर क्वचितच हाताळला गेलेला ‘हॉरर आणि सस्पेन्स-थ्रिलर’ जॉनर यात अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे. याचबरोबर, मराठी रंगभूमीवरचा हा पहिला 360 -डिग्री इमर्सिव थिएट्रीकल अनुभव आहे. इथे पारंपरिक रचनेच्या पलीकडे जात ‘अरेना थिएटर’चा यशस्वी प्रयोग केला गेला आहे, जिथे प्रेक्षक वर्तुळाकार रचनेतील बैठकीत बसतात आणि सभोवती घडणाऱ्या घटना अनुभवतात. याशिवाय, संपूर्ण वातावरणात नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजनेचा केलेला प्रभावी वापर प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढवतात.

Maharashtra TimesSunil Pal On Samay Raina : घोर कलियुग!आधी अपशब्द वापरा मग सन्मानही मिळवा; महाराष्ट्र सरकराकडून समय रैनाचा सत्कार होताच सुनील पालचा संताप
लेखक हृषीकेश गुप्ते यांनी अत्यंत खुबीने कागदावर उतरवलेली ही थरारक कथा आणि दिग्दर्शक अभिप्राय कामठे यांनी मंचावर तांत्रिक अचूकतेसह ती जिवंत करण्यासाठी घेतलेली मेहनत हाच नाटकाच्या यशाचा खरा कणा आहे. दिग्दर्शकाच्या कल्पकतेमुळे आणि लेखकाच्या सशक्त लेखणीमुळे हा 360 अंशांचा गोफ अत्यंत प्रभावीपणे विणला गेला आहे.

या संपूर्ण वातावरणाला आणखी एका भयंकर आणि थरारक उंचीवर नेऊन ठेवतात ते म्हणजे लोकप्रिय अभिनेते उपेन्द्र लिमये. या नाटकात उपेन्द्र सर प्रत्यक्ष मंचावर दिसत नाहीत, पण त्यांचा खणखणीत आणि दमदार व्हॉईसओव्हर संपूर्ण नाट्यगृहाच्या कानाकोपऱ्यात घुमतो. तो आवाज फक्त ऐकू येत नाही, तर अंगावर काटा आणतो. मंचावर अंधार दाटलेला असताना, आजूबाजूला संशयाची सावली वावरत असताना, जेव्हा उपेन्द्र लिमये सरांचा तो रहस्यमय आणि भेदक सूर घुमतो, तेव्हा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही! दृश्य समोर दिसत नसतानाही केवळ आवाजाच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर निर्माण झालेला माहौल प्रेक्षकांना शेवटच्या सेकंदापर्यंत खिळवून ठेवतो.

Maharashtra TimesChandrachur Singh : काकीने केला घात, तिला आत्याची साथ! अभिनेत्याचे गंभीर आरोप, आजोबांच्या खोट्या सह्या दाखवत हडपली 156 वर्ष जुनी हवेली, 7 जणांविरोधात FIR
सुरुवातीपासूनच या प्रयोगाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. याचे सलग सातही प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत. पुण्याच्या ‘श्रीराम लागू रंग-अवकाश’ सारख्या रंगमंचावर पार पडलेले हे प्रयोग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अंधारात चाललेला हा खेळ, 360 अंश रचनेत बसलेले प्रेक्षक आणि वातावरणात घुमणारा उपेन्द्र लिमये यांचा तो गूढ आवाज – या सगळ्याची जादू अशी आहे, की प्रयोग संपल्यानंतरही त्याचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनात कायम राहतो.

थोडक्यात सांगायचं, तर ही केवळ एक कथा नसून मराठी रंगभूमीवरचा एक धाडसी आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा प्रयोग आहे. जर तुम्हाला भीती, सस्पेन्स आणि उत्तम नेपथ्य-प्रकाशयोजनेचा अचूक मेळ असलेला अनोखा अनुभव घ्यायचा असेल, तर हा प्रयोग चुकवणे म्हणजे मराठी रंगभूमीवरच्या एका ऐतिहासिक पर्वाला मुकण्यासारखं आहे.

कारण, या खेळाची गोष्ट अजून संपली नाही … आणि ती अंधारातल्या त्या आवाजासोबत तुम्हालाही शोधायची आहे! ‘नाट्यप्रभा निर्मिती’ अधिकृत पेजवर नाटकाच्या आगामी प्रयोगांच्या तिकीट बुकिंगसाठी माहिती उपलब्ध आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा