Headlines

Chandrachur Singh 156 Year Old Haveli Encroached Lands Sold Through Forged Will By Aunty ; काकीने केला घात, तिला आत्याची साथ! अभिनेत्याचे गंभीर आरोप, आजोबांच्या खोट्या सह्या दाखवत हडपली 156 वर्ष जुनी हवेली, 7 जणांविरोधात FIR


Actor FIR Against Family : वडिलोपार्जित असलेली हवेली आजोबांच्या खोट्या सह्या घेऊन हडपल्या प्रकरणी अभिनेत्याने आपल्या काकी आणि आत्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

chandrachur singh
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूड अभिनेता चंद्रचूड सिंगची अलीगडमध्ये एक हवेली होती, ज्यावर त्याच्या काका आणि काकीने त्याला फसवून ताबा मिळवला आहे. या प्रकरणी काका आणि काकीसह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रचूड सिंगचा भाऊ अभिमन्यू सिंगने चंद्रचूड सिंगसोबत जाऊन रोरावर पोलीस ठाण्यात यासंदर्भात एफआयआर दाखल केला. काका आणि काकीने फसवणूक करून एक बनावट मृत्युपत्र तयार केले, जमीन विकली आणि हवेलीवर ताबा मिळवला, असा आरोप त्यांनी केला आहे.

चंद्रचूड सिंग आणि त्याच्या भावाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काका आणि काकी यांच्याव्यतिरिक्त इतर सात जणांचीही नावे आहेत. अभिनेत्याने सांगितले की, त्यांचे आजोबा हयात असताना मृत्युपत्र तयार करण्याच्या स्थितीत नव्हते; मात्र, त्यांच्या निधनानंतर काका आणि काकीने इतरांशी संगनमत करून हवेली बळकावली आणि जमीन विकली.

Maharashtra TimesApurva Nemlekar Mangalgaur : अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर दणक्यात साजरी, भारतात नव्हे तर अमेरिकेत पारंपारिक उत्साहात रंगला खेळ
चंद्रचूड सिंहने ‘हवेली’चा ताबा आणि जमिनींच्या विक्रीबाबत भाष्य केले. यासंदर्भात ‘भारत समाचार’शी बोलताना तो म्हणाला, “आतापर्यंत सात जणांची नावे समोर आली आहेत आणि आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण प्रामुख्याने फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याशी संबंधित आहे. जेव्हा माझे आजोबा आजारी होते, तेव्हा माझी आत्या तिथे साक्षीदार म्हणून उपस्थित होती. माझे आजोबा मृत्युपत्र तयार करण्याच्या मनस्थितीत किंवा शारीरिक स्थितीत नव्हते. त्यांच्या निधनानंतर त्यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली. माझे काका आणि आत्या यांनी तिथे उपस्थित असलेल्या दोन लहान मुलांसह आपसात संगनमत करून हे मृत्युपत्र तयार केले, जे पूर्णपणे बनावट आहे. यात सामील असलेल्या सात व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध आहे; त्यांनी साक्षीदार म्हणून काम केले आणि ते या गुन्ह्यात सहभागीही होते. त्यांनी जमिनींची विक्री केली ज्या जमिनींचे सर्वांमध्ये समान वाटप होणे अपेक्षित होते.”

चंद्रचूड सिंह हा जमीनदार कुटुंबातील असून त्याच्या जमिनी शेजारच्या गावांपर्यंत पसरलेल्या आहेत. विशेष म्हणजे, चंद्रचूड सिंह याचे वडील कॅप्टन बलदेव सिंह हे भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि 1985 मध्ये सदर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार झाले होते. त्याचे कुटुंब अलीगडमधील जुन्या जमीनदार घराण्यांपैकी एक मानले जाते. त्याच्या जमिनी जलालपूर आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये पसरलेल्या असून, कुटुंबातील सर्व सदस्यांचा त्यात समान वाटा आहे. पण, या जमिनींवरून अनेकदा वाद झाले आहेत; मात्र यावेळी परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली.

Maharashtra TimesJui Gadkari : 20 Feb 2020 च्या रात्री मी जी झोपले ते थेट ICU मध्ये जाग आली! कट्टर नॉनव्हेजिटेरियन जुई गडकरी कशी बनली शुद्ध शाकाहारी? सांगितलं कारण

काकांच्या निधनानंतर मालमत्तेवरून वाद

‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, चंद्रचूड सिंहच्या काकांच्या निधनानंतर जमिनीवरून वाद सुरू झाला. सुरुवातीला काका स्वीडनमध्ये राहत होते, परंतु भावाच्या निधनानंतर ते परत येऊन कौटुंबिक हवेलीत राहू लागले. मात्र, 2025 मध्ये चंद्रचूड सिंहच्या काकांचेही निधन झाले. त्यानंतर, ती जमीन आणि वडिलोपार्जित हवेलीवरील हक्क व ताबा यावरून कुटुंबात वाद निर्माण झाला.

आजोबांच्या निधनाच्या एक दिवस आधी बनावट मृत्युपत्र तयार

दरम्यान, चंद्रचूड सिंहचा भाऊ अभिमन्यू याने सांगितले की, आजोबांच्या निधनाच्या अवघ्या एका दिवस आधी एक बनावट मृत्युपत्र तयार करण्यात आले होते; या कारस्थानात त्यांची आत्या, घरातील सदस्य आणि काही बाहेरील व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांनी मिळून कुटुंबाची सर्व जमीन विकली आणि हवेलीचा ताबा घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आत्या आणि तिच्या मुलाने फसवणूक करून हवेली बळकावली आणि जमिनीही सोडल्या नाहीत. ही हवेली ‘द जलालपूर इस्टेट’ म्हणून ओळखली जाणारी एक ऐतिहासिक मालमत्ता असून ती 1870 मध्ये बांधण्यात आली होती. आता नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सात जणांची नावे आहेत. ज्यामध्ये चंद्रचूड सिंहची आत्या, चुलत भावंडे (भाऊ आणि बहीण), दोन साक्षीदार, एक वकील आणि एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे.

कोण आहे चंद्रचूर सिंह?

चंद्रचूर सिंग हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यात ‘माचीस’, ‘क्या कहना’, ‘सिलसिला है प्यार का’, ‘दाग: द फायर’, ‘जोश’ आणि ‘आमदानी अठानी खर्चा रुपैया’ सारख्या शीर्षकांचा समावेश आहे. 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा