Headlines

Gold and Silver Price Fall Today; सोन्याच्या दरानं अचानक बदलली चाल… चांदीही चमक फिकी पडली! खिसा रिकामा करण्यापूर्वी पाहा आजचा दर


Gold and Silver Rates: गेल्या आठवड्यातील स्फोटक तेजीनंतर सोन्याच्या बाजारात पुन्हा एकदा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील हालचालींचा देशांतर्गत सोने आणि चांदीच्या बाजारावर थेट परिणाम होत असून गुंतवणूकदार तसेच खरेदी करणारेही संभ्रमात सापडले आहेत.

मंगळवार, 7 जुलै 2026 रोजी, सकाळच्या सत्रात सोने-चांदीच्या दरांमध्ये घट होताना दिसून आली. गेल्या आठवड्यातील जोरदार तेजीनंतर या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये काहीशी कमजोरी दिसून येत असताना गुंतवणूकदार आता अमेरिकेच्या चलनविषयक धोरणातील पुढील घडामोडी, नवीन आर्थिक आकडेवारी आणि बाजारातील संकेतांकडे नजर ठेवून असतील.

Maharashtra TimesSaudi Oil Price Cut: तेलाच्या खेळात सौदी अरेबियाची बाजी! भारताच्या मित्राने वाढत्या किमतीतवर केला 26 वर्षांतील सर्वात मोठा ‘स्ट्राईक’

​सोने-चांदीत घसरण सुरूच

भारतातील फ्युचर्स मार्केट, MCX वर, सकाळी 9.25 वाजता सोन्याचे फ्युचर्स सुमारे 1100 रुपयांनी घसरून 1.45 लाखांच्या आसपास व्यवहार आहेत. तसेच चांदीचा वायदा दरही 3000 रुपयांनी घसरून 2.33 लाख रुपयांवर कमी झाला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या जून महिन्याच्या धोरण बैठकीचे मिनिट्स 8 जुलै रोजी प्रसिद्ध होतील. महागाई 2% च्या लक्ष्यापेक्षा जास्त असल्याने फेड यावर्षी किमान एकदा व्याजदर वाढवेल अशी बहुतेक तज्ञांना अपेक्षित असून यामुळे सोन्या-चांदीवरील दबाव सतत वाढत आहे.

त्याचप्रमाणे, जूनच्या सुरुवातीला अमेरिका-इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आणि महागाईचा दबाव वाढल्यामुळे यावर्षी फेडरल रिझर्व्ह तीनदा व्याजदर वाढण्याची अपेक्षा वाढली.

Maharashtra Timesशेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! SEBI च्या नव्या नियमाने मंदीतही होऊ शकेल बंपर कमाई, चढ-उतारांना ब्रेक लागणार

गेल्या आठवड्यात सोने-चांदीला झळाळी

मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत 2% वाढ नोंदवली गेलेली तर, चांदीचा भावही जवळपास 5% वाढला होता. अमेरिकी डॉलरमधील कमजोरीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी आलेली. तसेच अपेक्षेपेक्षा कमकुवत अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीनंतर, फेड रिझर्व्ह व्याज दरांबाबत कमी कठोर भूमिका घेण्याची अपेक्षाही वाढली.

मध्यपूर्वेतील संघर्ष निवळल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीजवळील भू-राजकीय तणाव कमी झाला ज्यामुळे सोन्याला आधार मिळाला, तर मध्यवर्ती बँकांच्या खरेदीने बाजाराला आधार दिला, मात्र ETF मधील गुंतवणूक कमी राहिली. अशा परिस्थितीत, खालच्या पातळीवरून रिकव्हरी दिसून आली असून त्यामुळे व्यापक तेजी पुन्हा सुरू होण्यापूर्वी काही अल्पकालीन घसरणीची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अलीकडील तेजीनंतर चांदीच्या किमतीतही काही काळ स्थिरता राहू शकते.

इराणचा होर्मुझवर पुन्हा हल्लाबोल
त्याचवेळी, होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणने व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्याचे नवीन वृत्त समोर आले, ज्यामुळे भू-राजकीय चिंता वाढली असून, त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होताना दिसत आहे. ॲक्सिऑसने दोन अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या लष्कराने सोमवारी रात्री होर्मुझमधून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर दोन क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे आता अमेरिका इराणी लक्ष्यांवर हल्ले करून प्रत्युत्तर देण्याची शक्यता अहवालात पुढे वर्तवली गेली आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत