Sameer Khandekar On Daughter School : अभिनेता समीर खांडेकर आणि त्याच्या पत्नीला मुलीला मराठी शाळेतच शिकवायचे होते. त्यासाठी दोघांनी मोठा निर्णय घेतला.

समीर खांडेकर ने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी मूळचा लालबाग गिरणगाव मधला आहे. मधली दहा वर्ष म्हणजेच 2015 ते 2025 मध्ये लग्नानंतर मी बोरिवलीला राहायला गेलो. तिथे सतराव्या माळ्यावर मोठं छान घर होतं. पण कधी बांद्राच्या पुढे आलो की माझ्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं. वांद्रेच्याच्या पुढचा बाकी व गिरणगाव वगैरे माझ्या डोक्यातून जात नव्हता. माझे सगळे विचार मित्र वगैरे सगळेच इकडचे आहे. पुढे माझी मुलगी मोठी झाली. तिच्यासाठी आम्हाला शाळा बघायची होती. आम्ही दोघं एकाच विचाराचे आहोत त्यामुळे आम्हाला तिच्यासाठी मराठीच शाळा हवी होती. मग आम्हाला गोरेगाव मधील अभी गोरेगावकर ही शाळा सापडली. तिला तिथे ऍडमिशन घेता यावं यासाठी आम्ही बोरिवली सोडून गोरेगाव मध्ये शिफ्ट व्हायचं ठरवलं. शाळेचा फॉर्म वगैरे भरला ऍडमिशन झालं.
Shakuntala Nare : इंडस्ट्रीतल्या नामांकित नेपथ्यकाराने घातला 23 लाखांना गंडा! रात्रीस खेळ चाले फेम माईंनी सांगितली कटू आठवण
पण एका दिवशी माझ्या डोक्यात विचारायला की आपण बोरिवली मधून गोरेगाव मध्ये जाऊ शकतो तर अजून पुढे का नाही. मग अचानक एके दिवशी डोक्यात बालमोहन विद्यामंदिर शाळेचा विचार आला. मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला ऍडमिशन बद्दल विचारलं पण तेव्हा सर्व ऍडमिशन झाले होते. तरीही मी तिथल्या सरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला माझ्या मुलीसाठी मराठी माध्यमात ऍडमिशन हवं आहे. लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्या शाळेसाठी फॉर्म भरला आणि ऍडमिशन घेतलं. मग मला माझी पत्नी अचानक म्हणाली की खांडेकर आता दादरना… तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण ऍडमिशन तर घेतलं पण आता इथे शिफ्ट व्हावं लागेल. मुलीच्या शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा मला सल्ला दिला की शक्यतो तुमचे पाल्य सायकलने शाळेत येऊ शकेल असं घर बघा.
समीर खांडेकर पुढे म्हणाला की, मग आम्ही पार्काच्या इकडेच भाड्याने घर घेऊन राहिलो. त्यावेळीही आमचं रेस्टॉरंटच प्लॅनिंग सुरूच होतं. तेव्हा मी वांद्रे वगैरे ठिकाणी कॅफे उघडायचं विचार करत होतो. पण नंतर आमचं एक मत झालं की आता आपलं सगळं पुढे दादरमध्ये असणार आहे त्यामुळे रेस्टॉरंट सुद्धा दादरमध्ये सुरू करायचं. मग आम्ही दादर मधल्या सगळ्या जागा पिंजून काढल्या. मग आम्ही चार पावला मागे यायचा विचार केला. पहिला विकतचा घर होतं पण दादर मध्ये भाड्याने राहायला आलो. रेस्टॉरंट वर फोकस केला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं त्यामुळे आमचा दादरमध्ये सुद्धा स्वतःचा विकतच घर मिळालं. त्यानंतर या रेस्टॉरंट साठी एक गुजराती बंधू आहेत गोयल म्हणून त्यांनी ही जागा दिली. तो फक्त नावाला गुजराती आहे बाकी बाबूजींची नाटकं मराठीतून पाहिलेला अगदी मराठमोळा गुजराती माणूस आहे. त्यांनीही जागा अगदी सढळ हस्ते दिली…
Riteish Deshmukh : हा काय बाबा मुख्यमंत्र्यांचा मुलगा, याला सगळंच आयतं मिळणार!, करिअरच्या सुरुवातीला रितेश देशमुखवर टोमण्यांचा मारा, भावुक आठवण
त्यामुळे आज दादरमध्ये मुलीची शाळा झाली, स्वतःचा विकतच घर झालं आणि इथेच मराठमोळ रेस्टॉरंट सुद्धा उभं राहिलं. या सर्व गोष्टी अगदी सहा महिन्यात भराभर घडल्या. एखादी गोष्ट मनापासून मिळवायची ठरवली किती मिळतेच असं माझं झालं यामध्ये मला माझ्या आईची आणि पत्नीची खंबीर साथ मिळाली. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत समीर खांडेकरने हा किस्सा सांगितला.
समीरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास काहे दिया परदेस या मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने लव्ह लग्न लोचा, ती परत आलीय, हम बने तुम बने, हास्यजत्रा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. काही सिनेमांमध्ये सुद्धा त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच युट्युब सीरिजमध्ये सुद्धा तो गाजतोय.

