Headlines

Mumbai Fraud: एक घर अन् सतरा भाडेकरु! पवईत घरमालकाकडून ‘हेवी डिपॉझिट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक – powai 17 peoples defrauded of rs 1.25 cr by landlord under pretext of heavy deposits


Heavy Deposit Fraud Mumbai: या दाम्पत्याने आणि इतर १६ जणांनी केलेल्या तक्रारीनुसार, पवई पोलिस ठाण्यात अशोक खारवी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

heavy deposit
मुंबई क्राईम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : साधारण २५ ते ३० लाख रुपये किमतीचे एक घर. मात्र घरमालकाने या घरावर तब्बल सव्वा कोटी रुपये कमावले. घराची विक्री करून नव्हे; तर घर भाडेतत्त्वावर देऊन! पवईतील हे घर एक-दोघांना नव्हे, तर तब्बल १७ जणांना भाडेतत्त्वावर दिले आणि ‘हेवी डिपॉझिट’च्या नावाखाली प्रत्येकाकडून पैसे घेतले.

प्रत्यक्षात या १७ जणांपैकी कुणालाही घरात राहायला मिळाले नाही. कारण त्याने भाडेकरूंनाच ठरलेल्या भाड्याच्या रकमेपेक्षा अधिक पैशांचे लालूच दाखवून घरापासून लांब ठेवले. बँकेच्या गृहकर्ज थकबाकीची जप्ती नोटीस घरावर लागल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Maharashtra TimesConversion Act: धर्मस्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब! विधेयकावर राष्ट्रपतींची मोहोर; तुरुंगवास अन् दंडाचीही कायद्यात तरतूद
पवईतील तुंगा गावात हा प्रकार घडला. साकीनाका येथील एक दाम्पत्य घराच्या शोधात होते. घर खरेदी करण्याची त्यांची इच्छा असल्याने त्यांनी एका एजंटशी संपर्क साधला होता. मात्र त्यांच्या बजेटमध्ये घर उपलब्ध नसल्याने एजंटने त्यांना तुंगा गावातील भाड्याने उपलब्ध असलेल्या घराची माहिती दिली. दाम्पत्याने होकार दिल्यानंतर एजंटने त्यांचा घरमालक अशोक खारवी याच्याशी संपर्क करून दिला. खारवी याने दाम्पत्याला घर दाखवले. घर पसंत पडल्यावर एक वर्षासाठी सहा लाख रुपये ‘हेवी डिपॉझिट’ द्यावे लागेल, असे त्याने सांगितले. दाम्पत्याने ही रक्कम दिल्यानंतर, सध्या घरात भाडेकरू असून दोन महिन्यांत घर रिकामे करून देतो, असे आश्वासन खारवी याने दिले.

दोन महिन्यांनंतर दाम्पत्याने घराचा ताबा मागितला असता, भाडेकरू घर रिकामी करत नसल्याचे खारवी याने सांगितले. त्याऐवजी तुम्ही दिलेल्या रकमेच्या बदल्यात मीच तुम्हाला दरमहा भाडे देतो, असे सांगून त्याने काही महिने दाम्पत्याला भाड्याची रक्कम दिली. वर्षाची मुदत संपल्यानंतर खारवी याने ‘हेवी डिपॉझिट’ची रक्कम वाढवण्याची मागणी केली. दरमहा चांगली रक्कम मिळत असल्याने दाम्पत्यानेही डिपॉझिट वाढवून दिले.

Maharashtra TimesSRA Fraud Mumbai: मुंबईत मोठा SRA घोटाळा; 47 जणांकडून तब्बल 5.57 कोटी लाटले, आमदाराच्या ‘पीए’चाही सहभाग
काही महिने रक्कम दिल्यानंतर खारवी याने टाळाटाळ सुरू केली. अखेर दाम्पत्याने तुंगा गावातील घर गाठले. तेथे घर बंद आढळले. गृहकर्जाचे हप्ते थकवल्यामुळे बँकेने घरावर जप्तीची नोटीस लावल्याचे दिसून आले. दाम्पत्याने चौकशी केली असता खारवी याने अशाच पद्धतीने अनेकांकडून हेवी डिपॉझिट घेतल्याची माहिती समोर आली. त्यांनी इतर फसवणूक झालेल्या नागरिकांचा शोध घेतला असता आणखी १६ जणांची नावे पुढे आली. खारवी याने या सर्वांकडून जवळपास सव्वा कोटी रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा