Headlines

Balraj Sanghai Column | Adapt To Change & Avoid Toxic People


1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

सर्वच व्यक्तींमध्ये सर्वच प्रकारची योग्यता असते असे नव्हे. काही व्यक्तींमध्ये काही विशिष्ट गुण असतात. परंतु आपल्या एखाद्या विशिष्ट दृष्टीने ते अयोग्य असतात. योग्यता आणि अयोग्यता याचे मानक व्यक्ती, स्थळ, काळ, उपयुक्तता, प्रासंगिकता अशा अनेक कारणपरत्वे बदलतात.

वर्तमान परिस्थिती परिवर्तनाचे युग आहे. पूर्वी बदल व्हायचे परंतु ते मंद गतीने. आज बदल होतात पण ते अत्यंत वेगाने, गतीने. या बदलाच्या गतीनुसार प्रत्येकाच्या अपेक्षा, आवश्यकता, अनिवार्यता बदलत आहेत. म्हणूनच प्रत्येकाची जीवनशैली देखील बदलत आहे. त्यामुळे कोणी अमुक व्यक्तीने एखाद्या परिस्थितीत आपल्या मनाप्रमाणे चालावे, वागावे हे आज अयोग्य ठरत आहे.

पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातील राहणीमान आणि आजच्या काळात असलेल्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून येत आहे. त्यामुळे आजचे स्वाभाविक वर्तन हे वर्तमानातील सहज संस्कार बनले आहे. पूर्वीच्या वळणाने संस्काराने चालणारे खूप कमी व्यक्ती उरलेले असताना त्यांना हे न पटणे स्वाभाविक आहे. पिढीगत अंतर म्हणजेच जनरेशन गॅप हा मोठ्या दरीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी निदर्शनास येतो.

पूर्वेकडील देशांमध्ये याबाबतीत खूप मोठे बदल फार पूर्वी घडून गेलेले आहेत. तेथील सभ्यता आणि संस्कृती आता वेगळी आहे. या तुलनेमध्ये पूर्वेकडील देशात म्हणजेच भारतामध्ये अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भारतीय सभ्यता आणि संस्कृती टिकून आहे. परंतु जग चालले आहे. त्या गतीने चालण्याचा प्रयत्नही नवीन पिढी करत आहे. हे संतुलन या ठिकाणी मला फार महत्त्वाचे वाटते. बदल स्वीकारायचा आणि संस्कारही विसरायचे नाहीत हे फार मोठे वाण किंवा व्रत आहे. नवीन पिढीने याचा स्वीकार केलेला आहे. कमी अधिक प्रमाणात का होईना आपल्या देशांमधील नवीन पिढीत काही संस्कार, काही मूल्य आजही विद्यमान आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

काही व्यक्तींना दुसऱ्याचा उत्कर्ष ही सहन होत नाही. काही व्यक्ती दुसऱ्यांच्या विकासामध्ये, सफलतेमध्ये सतत बाधा बनतात. असे व्यक्ती स्वतःच्या उन्नती बद्दल सुद्धा उदासीनच असतात. कारण त्यांची शक्ती वेळ सतत दुसऱ्याचा बाबत विचार करण्यामध्येच खर्च होते. अशा प्रकारचे योग्यता आणि पात्रता नसलेल्या व्यक्तींचा सहवास टाळावा. आपल्या भविष्याच्या दृष्टीने हे योग्यच.

आज जगाच्या बरोबरीने चालायचे असताना प्रत्येकाला सहवास देखील त्या पद्धतीचाच असावा हे अयोग्य नाही. अत्यंत गतीने होणारी प्रगती आपल्यातही व्हावी प्रयत्न देखील चुकीचा नाही. म्हणून यात अडथळा निर्माण करणारे व्यक्ती कोणी टाळत असेल तरीही ते ठीकच म्हणावे लागेल. त्यामुळे असे वाटते की आज हा आग्रह कालबाह्य होतो की मला गृहीत धरले नाही, मला टाळले. हे टाळणे एखाद्याच्या दृष्टीने अयोग्य असले तरी दुसऱ्याच्या दृष्टीने ते योग्य असू शकते. कारण त्या ठिकाणी त्याची ती आजची आवश्यकता असते आणि अनिवार्यता देखील.

(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

(संपर्क- 9420015108)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत