अशा परिस्थितीत, आता पुढील काही तासांत भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीसह गुंतवणूकदार दंडापेक्षा फौजदारी खटला रद्द होणे आणि कायदेशीर अनिश्चितता कमी होण्याला किती अधिक महत्त्व देतात, याकडे बाजाराचे लक्ष लागलेले आहे.
Titan Share: बाजाराच्या मूड स्वींगमध्ये 7 महिन्यांत 80000 कोटींचा परतावा, श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा TATA शेअर बनला रॉकेटखटला रद्द तरी दंड का?
अमेरिकेन न्यायालयातील या हालचालींमधील हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेतील फौजदारी खटला आणि एसईसीचा दिवाणी खटला या दोन वेगवेगळ्या कायदेशीर कारवाई होत्या. अमेरिकेत अदानींवर दोन वेगवेगळे खटले होते –
न्याय विभागाद्वारे फौजदारी खटला
अमेरिकेच्या न्याय विभागाने एकीकडे फसवणूक आणि लाचखोरीचे आरोप करत फौजदारी खटला दाखल केलेला, पण गौतम अदानी आणि सागर अदानी सतत आरोप फेटाळत आले. मे महिन्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने या खटल्याचा पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेतला आणि रद्द करण्याची न्यायालयाला विनंती केली. अशाप्रकारे, आता अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश निकोलस गॅराफिस यांनी सगळे फौजदारी आरोप रद्द केले आहेत.
SEC ची दिवाणी तक्रार
दुसरीकडे अमेरिकी शेअर मार्केट नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन – SEC – ने दिवाणी तक्रार दाखल केलेली, ज्यामध्ये अदानींना दंड ठोठावला गेला आहे. सोप्या भाषेत बोलायचे तर, एकाच घटनेसंदर्भात दोन वेगवेगळ्या कायदेशीर मार्गांचा अवलंब केला गेला असून फौजदारी खटला आता रद्द केला गेला, तर एसईसीचा दिवाणी खटला दंड आणि इतर अटींसह मिटवला आहे.
अदानी ग्रीन एनर्जीच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, अमेरिकन न्यायालयाने 10 ऑगस्ट, 2026 रोजी SEC च्या दिवाणी तक्रारीवर सहमतीने अंतिम निकाल दिला. या करारानुसार गौतम अदानींना 6 दशलक्ष डॉलर्स तर, सागर अदानींना 12 दशलक्ष डॉलर्सचा दिवाणी दंड भरावा लागेल. अशाप्रकारे, एकूण 18 दशलक्ष डॉलर्स रक्कम दंड भरावी लागेल.
मात्र, येथील आणखी एक मुद्दा म्हणजे की हा 18 दशलक्ष डॉलर्सचा दंड अदानी ग्रीन एनर्जीवर लादला नाही. कंपनीच्या फाइलिंगमध्ये गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यासाठी स्वतंत्र दिवाणी दंडांचा उल्लेख असून गुंतवणूकदारांनी हा फरक समजून घेतला पाहिजे.
अमेरिकी कोर्टाच्या निर्णयावर गौतम अदानींची प्रतिक्रिया
दरम्यान, अमेरिकी कोर्टाच्या निकालानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींनी आपल्यावरील फौजदारी आरोप फेटाळून लावण्याच्या अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला नेहमीच ‘अत्यंत आदर’ राहिल्याचे म्हटले.
तसेच अब्जाधीश उद्योगपतीने दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईच्या निकालाचे सत्य, निष्पक्षता आणि कायद्याचे राज्य यांच्या विजयाचे प्रतीक अशा शब्दांत वर्णन असे केले. सोमवारी उशिरा X वर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, अदानींनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आणि भारताच्या विकासामध्ये आपल्या समूहाची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली.
“न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेबद्दलचा आदर आणि नम्रता बाळगून मी अमेरिकेच्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो,” असे अदानींनी X वरील पोस्टमध्ये म्हटले. याशिवाय “या आव्हानात्मक काळात सत्य, निष्पक्षता आणि कायद्याचे राज्य यांवरील आमचा विश्वास अढळ राहिला,” असेही पुढे लिहिले आणि या प्रकरणातील प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेदरम्यान अदानी समूहाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्यांचेही आभार मानले.
अमेरिकेच्या न्याय विभागाने नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय सरकारी संस्थांकडून सौर ऊर्जेचे फायदेशीर कंत्राट मिळवण्यासाठी 265 दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीच्या प्रकरणात अदानी समूह आणि सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करणारे आरोपपत्र सार्वजनिक केल्यानंतर जवळपास 2 वर्षांनी प्रकरण मिटले. याव्यतिरिक्त, समूहाच्या भ्रष्टाचार-विरोधी उपक्रमांबाबत खोटी माहिती देऊन अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात सहभागी असल्याचा अदानींवर आरोपही केला गेला होता.

