विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी ही तपासणी केवळ कागदोपत्री न करता प्रत्यक्ष पाहणी आणि छायाचित्रांसह अहवाल तयार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
दरम्यान, कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे आणि संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shambhuraj Desai : ‘काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात’, सातारा झेडपीतील राडा प्रकरणावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रियाजपतलाई येथील आश्रमशाळेत रविवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता. यातील सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनू गजुराम कोरेटी (८) या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. उर्वरित तीनपैकी दीपिका बिटलूरसाय मडावी (११) हिच्यावर नागपुरातील मेडिकलमध्ये तर समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) या दोघींवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या तिन्ही विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यातच डॉ. उईके यांनी जपतलाई आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळासह संपूर्ण परिसराची पाहणी केली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजनगृह, स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून डॉ. उईके यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
Ratnagiri News: बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्तताशाळा प्रशासनावर कारवाई
सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक प्रशांत विलासराव ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिल्लमवार आणि अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इमारतींची ‘सेफ्टी टेस्ट’ होणार
आश्रमशाळांच्या इमारतींमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. इमारतीच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संयुक्त तपासणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्र्यांचे निर्देश…
-राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची वर्षातून दोनदा प्रत्यक्ष तपासणी करावी.
-तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची नोंद करावी.
-त्रुटी दूर करण्यासाठी निश्चित कालमर्यादा द्यावी.
-संबंधित त्रुटी दूर न झाल्यास जबाबदार अधिकारी, संस्थेवर कारवाई करावी.

