Headlines

Gadchiroli News: आश्रमशाळांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’; सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींनी जीव गमावल्यानंतर आदिवासी विकास मंत्री उईकेंची घोषणा – ashram schools third-party audit to be conducted ashok uike announcement


म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी मोठी घोषणा केली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी ही तपासणी केवळ कागदोपत्री न करता प्रत्यक्ष पाहणी आणि छायाचित्रांसह अहवाल तयार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

दरम्यान, कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे आणि संस्थेचे सचिव तथा काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesShambhuraj Desai : ‘काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात’, सातारा झेडपीतील राडा प्रकरणावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रियाजपतलाई येथील आश्रमशाळेत रविवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजताच्या सुमारास सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता. यातील सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनू गजुराम कोरेटी (८) या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. उर्वरित तीनपैकी दीपिका बिटलूरसाय मडावी (११) हिच्यावर नागपुरातील मेडिकलमध्ये तर समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) या दोघींवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या तिन्ही विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यातच डॉ. उईके यांनी जपतलाई आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळासह संपूर्ण परिसराची पाहणी केली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजनगृह, स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून डॉ. उईके यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Maharashtra TimesRatnagiri News: बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्तताशाळा प्रशासनावर कारवाई

सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक प्रशांत विलासराव ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिल्लमवार आणि अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

इमारतींची ‘सेफ्टी टेस्ट’ होणार

आश्रमशाळांच्या इमारतींमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. इमारतीच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संयुक्त तपासणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्र्यांचे निर्देश…
-राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची वर्षातून दोनदा प्रत्यक्ष तपासणी करावी.
-तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची नोंद करावी.
-त्रुटी दूर करण्यासाठी निश्चित कालमर्यादा द्यावी.
-संबंधित त्रुटी दूर न झाल्यास जबाबदार अधिकारी, संस्थेवर कारवाई करावी.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत