TATA Group Stock News Today: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर मार्केटमध्ये वर-खाली व्यवहार होताना दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट व्यवहार करत असताना टाटा ग्रुपचा दिग्गज स्टॉक मात्र तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. तिमाही कामगिरीच्या जोरावर टाटा समूहाचा करोडपती स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि अनेक ब्रोकरेज कंपन्यांही बुलिश दिसत आहे.

सपाट बाजारात टाटा स्टॉक सुस्साट सुटला
देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी, टाटा ग्रुपची कंपनी – टायटन शेअर्स – नी सोमवारी सुस्त पडलेल्या बाजारात 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजाराचे ‘बिग बुल’ म्हणून ओळख मिळवून देणारा टायटन स्टॉक जवळपास दोन वर्षांच्या कमी परताव्यांनंतर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचा स्टॉक बनला आहे.
शिक्षक मागताहेत गलेलठ्ठ पगार, OPS, रिटायरमेंटचे वय अन् भरपूर सुट्ट्या; मॅरेथॉन बैठकीनंतर 8व्या वेतन आयोगातील नवीन अपडेटयावर्षी कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 80,000 कोटींनी वाढले त्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. यापैकी दागिन्यांची स्थिर मागणी, सोन्याच्या स्थिर किमती, संघटित दागिन्यांच्या बाजाराचा वाढता वाटा, तनिष्क आणि कॅरेटलेनची दमदार कामगिरी यांसारख्या घटकांचा समावेश आहे.
सुस्त पडलेल्या टायटन स्टॉकची उभारी
गेल्या दोन वर्षांत टायटन शेअरने जवळपास स्थिर परतावा दिला असताना गुंतवणूकदारांना काय करायचं सुचेना झालेलं. त्याचवेळी, गेल्या आठवड्यात, शुक्रवारी, टायटन स्टॉकने 4,943 रुपायंवर क्लोजिंग केलेली आणि 4,977.20 रुपयांवर ओपन झाला. त्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत 3 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेऊन 5,121.30 रुपयांवर पोहोचला, जो या स्टॉकचा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यासोबतच कंपनीचे एम-कॅपही 4.5 लाख कोटींवर पोहोचले.
टायटन कंपनी लिमिटेडमध्ये रेखा झुनझुनवाला यांचा 5.3% हिस्सा असून प्रमोटर्सकडे 52.90 टक्के, तर FIIs कडे 15.4 टक्के हिस्सा आहे.
टायटन स्टॉकची कामगिरी
त्याचवेळी, स्टॉकमध्ये आतापर्यंत टाटा ग्रुपच्या टायटन स्टॉकने दणदणीत परतावा दिला आहे. मागील तीन महिन्यांत शेअरचा भाव 11 टक्क्यांनी वाढला तर, एका वर्षात या स्टॉकमध्ये 44.73 टक्के वाढ झाली आणि यादरम्यान, सेन्सेक्स निर्देशांक केवळ 1.66% वधारला. तसेच दोन वर्षांत शेअरची किंमत 50% वाढली असून ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपासून टायटनचे शेअर्स खरेदी केली आणि अजूनही होल्ड करून ठेवले असतील त्यांना 1136% नफा झाला असेल.

