Headlines

Futures and Options Trading Loss; 1.6 लाख पगार, 1.85 लाख EMI; FNO ट्रेडिंगमध्ये मुंबईतील IT तरुणाने गमावले 80 लाख, पटकन श्रीमंत होण्याच्या गेममध्ये फ्युचर गंडले


Futures and Options Trading Loss: शेअर बाजारातून रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात मुंबईतील एका आयटी मॅनेजरने 80 लाख रुपये गमावले आणि आता त्याच्यावर 60 लाख रुपयांचे प्रचंड कर्ज झाले असून कर्जाचा हप्ता पगारापेक्षाही जास्त झाला आहे.

Mumbai IT Professional Futures And Options Loss
मुंबईतील IT तरुणाने गमावले 80 लाख, पटकन श्रीमंत होण्याच्या गेममध्ये फ्युचर गंडले
Share Market Update: शेअर बाजारातून रात्रीत श्रीमंत व्हायचं स्वप्न बरेच लोक बघतात पण, या नादात आपली अख्खी कमाई गमावून बसतात. मुंबईतील एका आयटी व्यावसायिकाची कहाणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जो शेअर बाजारातून रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो लोकांसाठी धडा आहे.

देशांतर्गत शेअर बाजारातील फ्युचर्स आणि ऑप्शन्स म्हणजेच F&O सेगमेंटच्या ट्रेडिंगमधील धोके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबईतील 35 वर्षीय तरुण आयटी व्यावसायिकाने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर F&O ट्रेडिंगमध्ये 80 लाख रुपये गमावल्याची दावा केला आहे. आर्थिक दबाव वाढत गेल्याने या तरुणाने मदतीसाठी रेडिटवर सल्ला मागितला तर, अनेक माध्यमांनी या आयटी व्यवस्थापकाची कहाणी प्रसिद्ध केली आहे.

Maharashtra TimesProperty Documents: घर नवं असो किंवा जुने ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासल्याशिवाय डील करू नका! नाहीतर जाईल मालकी, तुमचे पैसे बुडतील

मुंबईतील तरुणाने शेअर बाजारात गमावले 80 लाख

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये तरुणाने लिहिले की, त्याचा पगार दरमहा 1.6 लाख रुपये आहे, पण फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगच्या व्यसनाने कर्जाच्या खाडीत ढकलले असून त्याचा दरमहिन्याचा ईएमआय 1.85 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मदतीसाठी याचना केली आहे.

करोनातील व्यसनाधीनतेमुळे झाला दिवाळखोर

‘gaushi1614’ या नावाने मुंबईतील या आयटी मॅनेजरने रेडिटवर आपली व्यथा मांडली. या तरुणाने सांगितले की, कोविड-19 च्या काळात शेअर बाजार आणि एफ अँड ओ ट्रेडिंग सुरू केली. सुरुवातीला सामान्य ट्रेडिंग सुरू होती, पण कालांतराने तोटा वाढू लागला. सुरुवातीचा तोटा भरून काढण्याच्या प्रयत्नात सतत अधिक व्यवहार करत राहिला आणि ही प्रक्रिया हळूहळू एका गंभीर आर्थिक संकटात बदलली. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये अंदाजे 80 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले.

Maharashtra TimesInventory Based Export : आता लहानशा व्यवसायही घेणार आंतरराष्ट्रीय झेप; निर्यातीसंबंधित नवा नियम, ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योगांसाठी सुवर्णसंधी

पगारापेक्षा मोठ्या ईएमआयचा सापळा

आता या तरुणावर अशी परिस्थिती ओढवली आहे की अंदाजे 60 लाख रुपयांपर्यंत कर्जाचा बोजा वाढला असून वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड, एनबीएफसी आणि डिजिटल लोन ॲप्स यांसारख्या अनेक स्रोतांकडून घेतले. यापैकी एकट्या क्रेडिट कार्डचे थकीत बिल 7 लाख रुपये असून दरमहा 1.6 लाख रुपये कमावणाऱ्याला हप्त्यांमध्ये 1.85 लाख रुपये भरावे लागत आहेत.

याशिवाय या आयटी तरुणाने पुढे सांगितले की, आतापर्यंत एकही ईएमआय थकीत राहिलेला नाही, पण जर ही परिस्थिती अशीच राहिल्यास लवकरच घरखर्च भागवणेही अशक्य होईल. नवीन कर्ज मिळवण्याचे किंवा कर्ज मिळवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले.

Maharashtra TimesGen Z Gold Investment: गोल्ड मार्केटमध्ये नवा ट्विस्ट, ‘जेन झीं’चा 315 लाख कोटींच्या सोन्यावर डोळा; अनेक पिढ्यांची परंपरा मोडीत काढणारकुटुंबापासून लपवलीये सत्य परिस्थिती

या सर्व परिस्थितीत सर्वात दुःखद बाब म्हणजे, या तरुणाच्या कुटुंबाला – पत्नी आणि मुले – प्रचंड कर्जाबद्दल काहीच कल्पना नाही.कर्ज वसुली एजंट घरी आले किंवा फोन करू लागले, तर कुटुंबाचे काय होईल याची आताच भीती लागली आहे. आता या आयटी व्यावसायिकाने ट्रेडिंग पूर्णपणे सोडून दिले असून आता त्याची एकच इच्छा आहे की कर्जाचा मासिक हप्ता कसातरी 1.2 ते 1.3 लाखांपर्यंत कमी व्हावा जेणेकरून घरखर्च भागू शकेल आणि हळूहळू संपूर्ण कर्ज फिटेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा