Funding agent leaking military information to pakistans isi arrested major operation in chhatrapati sambhajinagar; थेट पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन, महाराष्ट्रातून संशयित फंडिंग एजंटला अटक; भारतीय सैन्याची माहिती लीक करणाऱ्यांना पुरवायचा पैसे
Funding agent leaking military information to pakistans isi arrested major operation in chhatrapati sambhajinagar; थेट पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन, महाराष्ट्रातून संशयित फंडिंग एजंटला अटक; भारतीय सैन्याची माहिती लीक करणाऱ्यांना पुरवायचा पैसे
छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना ISIच्या देशव्यापी हेरगिरी आणि आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराची अत्यंत गोपनीय माहिती थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचवणाऱ्या कथित हेरगिरी रॅकेटला आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली राजस्थान सीआयडीच्या गुप्तचर विभागाने छत्रपती संभाजीनगरमधून रफीक चाँद शेख (वय ४१) या संशयिताला अटक केली आहे. ३० जून रोजी ही धडक कारवाई करण्यात आली असून, या अटकेमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित गुप्त माहिती लीक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
राजस्थान पोलिसांच्या तपासानुसार, जानेवारी २०२६ मध्ये अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्याच्या सखोल तपासात अत्यंत धक्कादायक धागेदोरे पोलिसांच्या हाती आले. यापूर्वी जैसलमेरमधील झबरा राम आणि आसाममधील भारतीय हवाई दलाच्या डिब्रुगड तळावर कार्यरत असलेला एमटीएस कर्मचारी सुमित कुमार याला देशद्रोहाच्या आणि पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान, या दोन्ही आरोपींना हेरगिरीसाठी मिळणारा निधी छत्रपती संभाजीनगरच्या रफीक चाँद शेखमार्फत पोहोचवला जात असल्याचे बँक खात्यांच्या व्यवहारांवरून स्पष्ट झाले.
अशी उघड झाली रफीकची मोडस ऑपरेंडी
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रफीक चाँद शेख हा स्वतः थेट कोणतीही संवेदनशील माहिती गोळा करत नव्हता, तर तो ISI चा मुख्य फंडिंग एजंट म्हणून काम करत होता. तो गेल्या सुमारे चार वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील एका आयएसआय हँडलरच्या थेट संपर्कात होता. हँडलरच्या सूचनेनुसार रफीकने स्वतःच्या तसेच इतर लोकांच्या नावावर अनेक बँक खाती उघडली होती. या खात्यांमध्ये विविध माध्यमांतून आधी निधी जमा केला जायचा आणि त्यानंतर तो पैसा टप्प्याटप्प्याने भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानात पाठवणाऱ्या आरोपींपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवला जायचा, असा तपास यंत्रणांचा दावा आहे.
राजस्थान सीआयडीने ३० जून रोजी रफीकच्या मुसक्या आवळल्या असून, या आंतरराष्ट्रीय आर्थिक साखळीत आणखी कोणकोणत्या व्यक्ती सामील आहेत आणि हा पैसा कुठून येत होता, याचा सखोल तपास सुरू केला आहे. देशविरोधी कारवायांमध्ये आणि देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा कडक इशारा राजस्थान पोलिसांनी दिला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा