Headlines

Maharashtra Times Half Damdi,दीड दमडी : लोळतो गटारी – maharashtra times did damdi article


लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी
जाहलो खरेच धन्य, डुंबलो गटारी
मी ना राजकारणी,
ना शुभ्रवस्त्रप्रावरणी
मज नसे दार, मज नसे बार
मज नसे कार,
आम्हा मिळती धुळलोट केवळ
अन् तुडविती पॉश मोटारी
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

ग्लासाच्या बाथटबी छान,
बर्फास घातिले स्नान
कधी पिवळसर, कधी लालसर,
कधी निळसर
विवस्त्र बर्फाच्या देही
घुसली रंगीत कटारी
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

उकडला गुलाबी चना,
कधी भाजला शेंगदाणा
लसणाची शेव, काजूची ठेव,
चकलीचा देव
भुरभुरूनी चाटमसाला
आणिली चव मटारा…
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

आग्रहाच्या नानाची टांग.
चल, आणखी एक सांग
पेग पहिला, पेग दुसरा.
पेग तिसरा
नकोस मोजू, चल रिचव
तिला पोटाच्या पेटारी
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

असा भला मोठा मग.
काठाशी फेसांचे ढग
एक धरली, उभी चिरली
आणि पेरली
मिरची त्या मधुर द्रवी
जणू वाजवी तुतारी
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

पेल्याच्या काठास उगवली
आम्लदेही एक तबकडी
रस झरितो, रस भरितो
रस प्राषितो
कोणी त्या अनाम निंबास
घातले कुठारी
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

तळाशी मोहक मुद्देमाल.
त्यात हवे ते घाल
सोडा कुणा, पाणी कुणा
ठंडा कुणा
स्कॉट देशीचे पाणी
त्याची नजाकत भारी
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

मयसभा धुराने भरली
रात्रही अर्धी सरली
कुणी बोबडा, कुणी भाबडा
कुणी गडबडा
कुणी मिन्टा मिन्टा
डोलत गाठतो मुतारी
लाभले आम्हास भाग्य लोळतो गटारी

प्रश्न एकचि सतावे, रोज घरी का जावे?
ही मधुशाला, इथे शांती जिवाला
दाल खिचडी सोबतीला
ही माझी मी हिचा
ठेवले काय संसारी?
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

पिण्या बहाणे अनेक
लोळण्या दिवस एक
चिखल खेळू, छान लोळू
मस्त घोळू
एकदा येते तशी
का न रोज गटारी?
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

तळीरामांची तळी उचलत
केश्टोभाईंना दंडवत
बेहोश आम्ही, बेशुद्ध आम्ही
मदहोश आम्ही
शुद्धीवरल्यांच्या दुःखासाठी
सोसतो गटारी
लाभले आम्हास भाग्य लोळलो गटारी

तंबी दुराई

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत