Headlines

Mumbai Under Heavy Rain Alert Videos of Flooded Roads Video Go Viral | मुंबईत कुठे कुठे पाणी तुंबलं आहे? लाखोंच्या गाड्या जाताहेत वाहून, पावसाचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल


Heavy Rain Mumbai Video: मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. त्यामुळे वाहतूक सेवा अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. याचदरम्यान धडकी भरवणारे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मोठमोठ्या गाड्या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हा पाऊस असाच सुरू राहिला, तर पुन्हा एकदा २६ जुलैसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

New Project (30)
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक सेवा संथ गतीनं सुरू आहे. दरम्यान अंधेरी, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, वडाळा, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वसई-विरार आणि इतर काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी इतकं पाणी तुंबलं आहे की मोठमोठ्या वजनदार गाड्याही खेळण्यातल्या गाड्यांप्रमाणे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हे व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
(फोटो सौजन्य – @Deb_livnletliv/x.com)

भारतीय हवामान विभागाने मुंबईकरांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे. कारण पुढील काही तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुढील काही तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई लोकल सेवेवरही झाला असून काही गाड्या १० ते १५ मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा