Headlines

Free Ration Scheme: संचालकही खायचे ‘मोफत धान्य’; योजनेतून वगळले 42 हजार कार्ड, लाभार्थ्यांत प्राप्तिकर भरणाऱ्यांचाही समावेश – free food grain scheme stopped for more than 42000 ration cardholders in nagpur


प्रवीण लोणकर, नागपूर : गरिबांसाठी राबविण्यात येणाऱ्या मोफत धान्य योजनेचा लाभ निकषात न बसणारे लाभार्थीही घेत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर शासनाने अशा लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ४२ हजारांहून अधिक रेशनकार्डधारकांचा मोफत धान्याचा लाभ बंद करण्यात आला आहे.या कारवाईत अधिक उत्पन्न असणारे, विविध मंडळांवर संचालक असणारे तसेच दीर्घकाळ धान्य न उचलणारे लाभार्थी यांचा समावेश आहे. पुरवठा विभागाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेतून ही नावे समोर आली.

गरजू कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ काही अपात्र नागरिक घेत असल्याचे तपासणीत आढळले. शहरातील १ लाख ८५ हजार ५५० लाभार्थी संशयास्पद असल्याचे पुरवठा विभागाच्या निदर्शनास आले आहे. ही नावे टप्प्याटप्प्याने वगळली जात आहेत.

Maharashtra TimesAmruta Fadnavis: फडणवीसांना महाराष्ट्रातच काम करु द्या; केंद्रात का पाठवताय? अमृता फडणवीसांचा सवालअधिक उत्पन्न असणाऱ्या ६१ हजारांहून अधिक लाभार्थी कुटुंबांची यादी शासनाने तयार केली आहे . यापैकी ३० हजारांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत . विविध मंडळांवरील संचालक असणाऱ्या ४ हजार ८३८ जणांचा आणि धान्य न उचलणाऱ्या ७ हजार ५४३ लाभार्थ्यांचा मोफत धान्याचा लाभही बंद करण्यात आला आहे.

ही वगळली नावे

उत्पन्न अधिक असणारे ३० हजार १५२

विविध मंडळांवरील संचालक : ४ हजार ८३८

धान्य न उचलणारे : ७ हजार ५४३

ही नावेही वगळणार

दोन ठिकाणी नावे असणारे : ६७ हजार १४०

वार्षिक उलाढाल अधिक असणारे ५१५

जमीनदार : ३५ हजार ५२३

Maharashtra TimesNagpur Crime : गळ्यात मंगळसूत्र, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या अन् फुगे, नागपूरच्या हॉटेलमध्ये रात्री किंचाळण्याचा आवाज, रुम नंबर 302 मध्ये काय घडलं?रेशन कार्ड मात्र सुरूच

शहरात एकूण ७ लाख १० हजार ६८९ रेशनकार्डधारक आहेत. त्यापैकी ३ लाख ६३ हजार ८०४ रेशनकार्डधारक प्राधान्य गटात, तर ४५ हजार ४२ रेशनकार्डधारक अंत्योदय गटात आहेत. सध्या ४ लाख ८ हजार ८४६ रेशनकार्डधारक मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. निकषात न बसणाऱ्यांचा मोफत धान्याचा लाभ बंद करण्यात आला असला, तरी त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात आलेले नाही. अशा कार्डधारकांना एचपीएच, म्हणजेच नॉन प्रायोरिटी हाउसहोल्ड गटात समाविष्ट करण्यात आले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत