Headlines

fraud of rs 45 lakh by promising a job at pune municipal corporation; पुणे महापालिका भरती घोटाळा; बनावट नियुक्तिपत्रांद्वारे उमेदवारांकडून 45 लाख उकळले, शिपायासह साथीदारांविरोधात गुन्हा


PMC Job Scam: आरोपींनी बनावट लेटरहेड व शिक्के तयार करून बोगस नियुक्तीपत्रांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

pune municipality
नोकरी घोटाळा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिकेच्या विविध विभागांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून शिपाई व त्याच्या साथीदारांनी उमेदवाराला बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याच्याकडून ४५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकरसह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बनसोडे आणि इतर साथीदारांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत महापालिकेच्या परिसरासह इतर ठिकाणी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Maharashtra TimesFDA Tukaram Mundhe: खाद्यपदार्थांबाबत सर्वाधिक तक्रारी पुणेकरांकडून; ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन अनेक बेरोजगार युवक-युवतींकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून बनावट नियुक्ती पत्र दिल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने या तक्रारींची पडताळणी केली असता, पाटण येथील एका तरुणाची भवन विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती केल्याचे बनावट पत्र आणि त्याची टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नेमणूक केल्याचा खोटा आदेश आढळून आला. या तरुणाने पुणे महापालिकेला नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये या पदावर नोकरी लावण्यासाठी आरोपी शिवानंद पाटील, राजेंद्र खेडेकर, नमिता बनसोडे व आणखी एकाने वेळोवेळी ४५ लाख रुपये घेऊन नियुक्ती पत्र दिल्याचे नमूद आहे.

Maharashtra TimesPune RTO: स्कूलबसवर कारवाईचा बडगा; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 90 टक्के वाहनांनी घेतले ‘फिटनेस’ प्रमाणपत्र
या नियुक्तीपत्रावर उपायुक्त व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट शिक्के, महापालिकेचे चिन्ह व वॉटरमार्कचा गैरवापर करून बनावट नियुक्तीपत्र दिल्याचे प्रशासनाच्या पडताळणीत समोर आले. आरोपींनी अनेकांना नियुक्तीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून रोख व धनादेश स्वरूपात रक्कम स्वीकारली असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने संबंधितांचे आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि पुराव्यांची तपासणी शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

डॉ. खेडकर यांनी आरोप फेटाळले
या प्रकरणात नाव आलेले जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी दिलेल्या निवेदनात आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. आपण स्वतः या प्रकरणातील तक्रारदार असून, अनेक पीडितांना पैसे परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महापालिकेची नियुक्तीपत्रे, बदली आदेश, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, स्वाक्षऱ्या किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी आपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण आर्थिक व्यवहार, बँक खाते, कॉल रेकॉर्ड व डिजिटल पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करून खरे दोषी समोर आणावेत आणि बदनामी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा