Headlines

Financial Changes from August 1; आजपासून बँकिंग आणि आर्थिक व्यवहारासंबंधीचे 7 नियम बदलणार, कोणकोणत्या बदलांचा थेट खिशावर होणार परिणाम?

Rules Changes From August 1st: नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असते आणि 1 ऑगस्टही याला अपवाद नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात यावेळीही बदल दिसून आला आहे. सर्वसामान्यांशी संबंधित अनेक बदल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला लागू होतात, तर 1 ऑगस्टपासून कोणते बदल लागू झाले आहेत पाहूया.

new rules from august 1
Rules Change: ऑगस्ट महिन्याच्या पाहल्या तारखेपासून असे अनेक बदल लागू होणार आहेत, ज्यांचा परिणाम थेट लाखो भारतीयांच्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. यामध्ये स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी आणि रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते बँकिंग सेवा आणि क्रेडिट कार्डच्या वापरापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून काही बदल लागू होणार असले, तरी 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून असेल, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या कर्जाचे हप्ते आणि ठेवींंवरील व्याजदरांवर होऊ शकतो.

तात्काळ बुकिंगसाठी टोकन प्रणाली

तात्काळ बुकिंगसाठी टोकन प्रणाली

1 ऑगस्टपासून भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे आता प्रवाशांना तात्काळ तिकीटासाठी आरक्षण काउंटरवर दोनदा रांगेत उभे राहावे लागणार नाही. या नवीन टोकन प्रणालीमुळे काउंटरवरील गर्दी कमी होईल आणि ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणे सोपे होईल.

एलपीजी सिलिंडर दरातील बदल

एलपीजी सिलिंडर दरातील बदल

प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 ऑगस्टपासून एलपीजीचे दरही सुधारित केले गेले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅसचा दर 200 रुपयांनी कमी केला पण घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.

बँकांमध्ये लागू होणार सीकेवायसी 2.0 प्रणाली

बँकांमध्ये लागू होणार सीकेवायसी 2.0 प्रणाली

बँका, विमा कंपन्या आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या मिळून सेंट्रल केवायसी, CKYC, 2.0 प्रणाली सुरू करणार आहे, जी एक सुरक्षित डिजिटल प्रक्रिया असेल. यामुळे वित्तीय संस्थांना ग्राहकांची मंजुरी मिळाल्यानंतर एका केंद्रीय नोंदणीतून आवश्यक तपशील मिळू शकेल.

क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल होणार

क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल होणार

1 ऑगस्टपासून अनेक बँका क्रेडिट कार्डविषयक धोरणांमध्ये सुधारणा करणार आहे, ज्यामध्ये रिवॉर्ड पॉइंट योजना, वार्षिक देखभाल शुल्क आणि इतर सेवा शुल्कांमधील बदलांचा समावेश आहे. या बदलांमुळे खर्चावर आणि मासिक बिलांवरील परिणाम समजून घेण्यासाठी ग्राहकांना सुधारित शुल्क चार्ट आणि कार्डच्या अटी-शर्ती तपासण्याचा सल्ला दिला जातो.

आरबीआयचा धोरणात्मक निर्णय

आरबीआयचा धोरणात्मक निर्णय

1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बदलांव्यतिरिक्त बाजार आणि कर्जदार 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या MPC च्या बैठकीकडे बारकाईने लक्ष ठेवून असतील. आरबीआय 5 ऑगस्ट रोजी आपला धोरणात्मक निर्णय जाहीर करेल. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर गृहकर्जाचे हप्ते, कर्जाचे व्याजदर आणि मुदत ठेवींवर मिळणारे परतावे अवलंबून असतील.

अतिरिक्त सामानासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा

अतिरिक्त सामानासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना आजपासून अतिरिक्त सामानाची ऑनलाइन बुकिंग सुविधा केवळ मिळवून दिली जाणार आहे. तसेच, ही सेवा एसी फर्स्ट क्लास, एसी 2-टायर, फर्स्ट क्लास, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे, मात्र एसी 3-टायर आणि एसी चेअर कारमधील प्रवाशांसाठी ती उपलब्ध नाही.

आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत

आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत

मूल्यांकन वर्ष (AY 2026-27 साठी आतापर्यंत 5.5 कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती आयकर विभागाने शुक्रवारी दिली. ‘X’ वर माहिती देताना विभागाने सांगितले की, केवळ 30 जुलै रोजीच 42 लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल केली गेली असून अंतिम तारीख जवळ येत असताना विवरणपत्रे दाखल करण्याच्या प्रमाणात झालेली ही मोठी वाढ दर्शवते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा