Headlines

Chhatrapati Sambhajinagar PWD Engineer Atul Chavan BJP MLA Anuradha Chavan husband resigns; पत्नी भाजप आमदार, सार्वजिनक बांधकाम विभागातील मुख्य अभियंते अतुल चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा


सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला.

Atul Chavan Anuradha Chavan Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी ३१ जुलै रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा विभागाच्या सचिवांकडे सादर केला आहे. पदोन्नतीची फाईल शासनाकडे रेंगाळल्याने आणि पात्र असूनही डावलले जात असल्याच्या उद्विग्नतेतून त्यांनी ३२ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेला चार वर्षे आधीच पूर्णविराम दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी व्हॉट्सॲपवर ठेवलेले ‘अंत नहीं, यह एक नई शुरुआत है…’ हे स्टेटस सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरले आहे.
Maharashtra TimesNarendra Modi : मला-माझ्या स्वर्गीय आईला शिवीगाळ, पण खोडकर मुलांना माफ करण्याची इच्छा; पंतप्रधान मोदी म्हणतात, भरकटलेल्यांना दिशा दाखवू
अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. एकाच कुटुंबात राजकारण आणि प्रशासनातील महत्त्वाची पदे असल्याने काहींनी शासनाकडे त्यांच्याविरोधात तक्रारी केल्याची चर्चा आहे. या राजकीय घडामोडींनंतर शासनाने २२ जून रोजी चव्हाण यांची नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी (मुंबई) येथे मुख्य अभियंता म्हणून बदली केली होती आणि त्यांना ३१ जुलै रोजी तेथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.

Maharashtra Rainfall : 3 दिवसात चित्र बददलं, IMD Report पावसाची तूट कमी, अनेक जिल्ह्यांना दिलासा

पदोन्नतीची फाईल रेंगाळली; ४ वर्षे आधीच सोडली नोकरी

सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी पात्र असल्याने त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पदोन्नतीची फाईल शासनदरबारी सादरही झाली होती; मात्र ३१ जुलैच्या सायंकाळपर्यंत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पात्र अधिकाऱ्यांना डावलून इतरांना संधी दिली जात असल्याच्या नाराजीतून चव्हाण यांनी ३२ वर्षांची सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला. शासकीय नियमानुसार ते मार्च २०३० मध्ये सेवानेवृत्त होणार होते, मात्र चार वर्षे आधीच त्यांनी राजीनामा दिला.
Maharashtra TimesTukaram Mundhe : मंत्रालय-विधानभवनाच्या कँटीन फ्रीजपेक्षा चप्पल स्टँड स्वच्छ, सरकारी आस्थापनांवर कारवाई का नाही? कोर्टाने FDA ला झापलं

अष्टविनायक मार्ग ते समृद्धी महामार्ग; उल्लेखनीय कारकीर्द

अतुल चव्हाण यांनी १६ ऑगस्ट १९९४ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत शासकीय सेवा बजावली. २००० मध्ये त्यांची कार्यकारी अभियंतापदी निवड झाली होती. अष्टविनायक दर्शन मार्गाचे काम अवघ्या २४ तासांत पूर्ण करणे, समृद्धी महामार्ग, विद्यापीठातील डिजिटल स्टुडिओ आणि कोल्हापूर सर्किट बेंचच्या वास्तूचे अल्पावधीत पुनर्निर्माण ही त्यांची उल्लेखनीय कामे ठरली. २०१० मध्ये त्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.