Headlines

FD vs RD vs SIP Calculator; 2000 रुपयांच्या बचतीत तुम्ही पण व्हाल लखपती; FD की RD की SIP कोणता गुंतवणुकीचा पर्याय सर्वात बेस्ट; पाहा Calculation


Investment Guide : दरमहिन्याला 2,000 रुपयांची बचत छोटी वाटू शकते पण लहान-सहन बचत करूनही दीर्घकाळात मोठा निधी जमा केला जाऊ शकतो. पण प्रश्न असा आहे की, पैसा गुंतवायचा कुठे? लक्षात घ्या की बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट, आरडी किंवा म्युच्युअल फंड एसआयपी असो, गुंतवणुकीची पद्धत आणि त्यातून मिळणारा परतावा वेगवेगळा असतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या पैशांवर सर्वाधिक परतावा कुठे मिळू शकतो हे समजून घेतलं पाहिजे.

2,000 रुपयांतून कुठं मिळेल चांगला परतावा?

तुमचे बजेट दरमहा 2,000 रुपये असेल आणि तुम्ही 10 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर, SIP मधून इतर दोन पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो पण यामध्ये बाजारातील जोखीमही असून याउलट FD आणि RD निश्चित परतावा देणारे अधिक सुरक्षित पर्याय आहेत. वेगवेगळ्या पर्यायांमध्ये 2,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून किती उत्पन्न मिळू शकते, खालील Calculation द्वारे पाहूया.

Maharashtra TimesNepal Floods: महापूर, ढगफुटीपासून स्वत:चं घर वाचवा; नुकसान झाल्यास मिळेल भरपाई, पण 5 चुकांमुळे फेटाळला जाऊ शकतो दावा

SIP द्वारे 10 वर्षांत किती रुपये कमवता येतील?

तुम्ही दहा वर्षांसाठी दरमहिन्याला 2000 रुपयांची SIP चालवली आणि सरासरी वार्षिक 12% परतावा गृहीत धरल्यास तुमची गुंतवणूक 2,40,000 रुपये होईल. अशाप्रक्रारे, यावर अंदाजे 2,08,072 रुपये परतावा मिळेल. अशाप्रकारे, 10 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 4,48,072 रुपये मिळतील. मात्र, लक्षात घ्या की SIP चा परतावा बाजाराशी लिंक्ड असतो. तसेच 12% परतावा निश्चित नसतो आणि प्रत्यक्ष रक्कम जास्त किंवा कमी असू शकते.

12 वर्षांत एसआयपीमधून 6.24 लाख रुपये

याउलट तुम्ही दरमहा 2,000 रुपये किंवा वार्षिक 24,000 रुपये गुंतवले आणि दहा वर्षांऐवजी 12 वर्षे गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक 2.88 लाख रुपये होईल. या गुंतवणुकीवर 6.5% दराने परतावा मिळाला, तर तुम्हाला 3,36,337 रुपये मिळतील. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची एकूण किंमत 6,24,337 रुपये होईल, पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही परताव्याचा दर आणि योजनेच्या अटी काळजीपूर्वक तपासून घेतल्या पाहिजे.

Maharashtra TimesRaksha Bandhan Gold Rate Today: रक्षाबंधनाला खरेदीची गोल्डन संधी; सणासुदीला 1.60 लाखांच्या खाली आलं सोनं, चांदीचे दरही गडगडले, चेक करा आजचा भाव

RD मधून 10 वर्षांत किती पैसे मिळतील?

याउलट तुम्ही RD मध्ये दरमहा 2000 रुपये गुंतवले आणि त्यावर 6.5% परतावा मिळवला, तर 10 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 2.40 लाख रुपये होईल. या कालावधीत तुम्हाला 97,978 रुपये व्याज मिळेल म्हणजे, 10 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 3,37,978 रुपये मिळतील. RD मध्ये ठराविक मासिक ठेव जमा करायची असते त्यामुळे नियमित छोटी-छोटी बचत करायची आहे आणि बाजारातील चढ-उतार टाळायचे आहेत, त्यांच्यासाठी हा एक सोपा पर्याय आहे.

एफडी, आरडी आणि एसआयपी यांपैकी कशाची निवड करावी?

सामान्यतः एफडीमध्ये एकरकमी रक्कम जमा केली जाते, तर RD मध्ये मासिक मुदत ठेवींचा समावेश असतो आणि SIP मध्येही मासिक गुंतवणूक करायची असते पण, पैसे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवले जातात आणि बाजाराच्या कामगिरीनुसार परतावा मिळतो.

अशा स्थितीत, सिक्युरिटी आणि निश्चित परतावा तुमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, तर एफडी किंवा आरडी या दोन्हींपैकी गुंतवणूक करू शकता. पण दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची असेल आणि बाजारातील जोखीम समजत असाल, तर एसआयपीमध्ये अधिक परतावा मिळू शकतो.

त्याचवेळी, केवळ परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची उद्दिष्ट्ये, गुंतवणुकीचा कालावधी, जोखीम स्वीकारण्याची क्षमता आणि आर्थिक गरजा यांचाही विचार करा. वरील SIP चे आकडे अंदाजे आहेत, तर बँक FD किंवा RD चे दर बँका आणि मुदतीनुसार वेगवेगळे असू शकतात.