Headlines

Dhule Songir Uncle has physically Abused Nephew Girl; गुप्तांग दुखू लागल्यानं लेकीला रडू कोसळलं; आईला सांगितला धक्कादायक प्रकार; काकानं कडी लावली अन्..


Dhule Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. यातचदरम्यान, सोनगीरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सोनगीरमध्ये सख्ख्या चुलत काकानचे आपल्याच पुतणीचे लचके तोडत लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Songir Uncle physically Abused on nephew
काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली असून चुलत काकानेच नात्याला काळीमा फासल्याची घटना घडली आहे. ऐन नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर करत कुमारींची पुजा केली जात असतानाच दुसरीकडे तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झाला. घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी काल सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपी मयुर माळीवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता. सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपी मयुर माळीला अटक केली आहे.

काकानेच पुतणीचे लचके तोडले

नवरात्रौत्सवात देवीची पूजाअर्चा केली जाते. पण याच नवरात्रौत्सवात काकानेच पुतणीचे लचके तोडले आहेत. याप्रकरणी पीडितेच्या आईने सोनगीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केलं की, ‘सायंकाळच्या सुमारास एक दुधवाला आला असता, सासू दुध घेण्यासाठी गेल्या, तेव्हा माझी तीन वर्षांची मुलगी देखील गेली होती. थोड्यावेळानंतर सासुबाई घरात आल्या तेव्हा त्यांनी मुलीबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ती चुलत काका मयूर माळी आला होता, तो तिला खेळविण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला होता. थोड्यावेळानंतर ती घरी आली रात्री झोपण्याची तयारी करताना लहान पीडिता मुलगी रडू लागली होती. तेव्हा काय झालं? असं विचारलं. तेव्हा तिचं गुप्तांग दुखू लागलं होतं. लहान मुलीने रडत घडलेला सर्व प्रकार सांगितला.

Maharashtra Timesशेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी ते 70 हजार हेक्टरी भरपाई, जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या

आतून कडी लावली अन्…

शेजारीच राहणाऱ्या नराधम चुलत काकाने त्याच्या घरी नेलं आणि आतून कडी लावली. बाहेर एक बाबा आला आहे असं त्यानं तिला सांगितलं. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर चिमुकलीनं घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. हे संपूर्ण प्रकरण ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पीडितेची आई पोलिस ठाण्यात गेली आणि तिथे तक्रार नोंदवली.

Maharashtra Timesतीन मुलांना मागे सोडून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, कुटुंबावर शोककळा; हृदयद्रावक घटनेने धाराशिवमध्ये हळहळ

सोनगीरात अवघ्या तीन वर्षीय चिमुरडीवर चुलत काकाने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप उसळला आहे. आज संतप्त सोनगीर ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर मूक मोर्चा काढून नराधम काकाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. या मोर्चात सोनगीर ग्रामस्थांसह जिल्हाभरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा सोनगीर पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर पी.आय. तुषार देवरे यांना निवेदन देण्यात आले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा