Dhule Family Court Decision against Father Man takes three years old daughter to end life Crime News; फॅमिली कोर्टाचा निकाल विरोधात, बापाने 3 वर्षीय लेकीसोबत व्हिडिओ बनवला, बंधाऱ्याजवळ बूट सापडल्याने महाराष्ट्र हादरला
Dhule Family Court Decision against Father Man takes three years old daughter to end life Crime News; फॅमिली कोर्टाचा निकाल विरोधात, बापाने 3 वर्षीय लेकीसोबत व्हिडिओ बनवला, बंधाऱ्याजवळ बूट सापडल्याने महाराष्ट्र हादरला
Dhule News : आपल्यापासून आपले मुलगी हिरावली जाईल या भीतीने दीपक सूर्यवंशी हे गुरुवारी पहाटे तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बेपत्ता झाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात येथे कौटुंबिक न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाचा निकाल आपल्या विरोधात लागताच पिता आपल्या तीन वर्षे मुलीसह बेपत्ता झाला आहे. गुरुवारी सकाळी तालुक्यातील बोधगावच्या बंधार्याजवळ त्याचे बूट आढळून आल्याने पित्याने स्वतःची जीवनयात्रा संपवून मुलीचीही हत्या केल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, बोधगाव परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे.
नेमकं काय झालं?
दीपक रामलाल सूर्यवंशी (रा. साक्री) याच्याविरोधात पत्नीने महिला अत्याचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले. यावर बुधवारी सायंकाळी न्यायालयात कामकाज होणार असल्याने दीपक दिवसभर न्यायालयात हजर होते. मुलीला आपल्याजवळ राहू द्यावे, अशी त्यांची मागणी होती.
निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे त्यांचे लक्ष असताना त्यांच्या विरोधात निकाल लागल्याचे त्यांना कळले. यामुळे आपल्यापासून आपले मुलगी हिरावली जाईल या भीतीने दीपक सूर्यवंशी गुरुवारी पहाटे तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बेपत्ता झाले.
व्हिडिओ व्हायरल केला
दरम्यान, दीपक यांनी बोधगाव धरणाजवळ आपल्या मोबाइलवर मुली सोबतचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला. त्यावरून सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता.
बंधाऱ्याजवळ बूट आढळले
ज्या बंधाऱ्याजवळ साक्री पोलिसांसह सूर्यवंशी कुटुंबीयांनी धाव घेतल्यावर बंधाऱ्याजवळ बुट दिसून आल्याने दीपक सूर्यवंशी यांनी मुलीसोबत धरणात आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. गुरुवारी सायंकाळी दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
कौटुंबिक कलह वाढला
दरम्यान, राज्य महिला आयोगातर्फे आयोजित जनसुनावणी दरम्यान एकूण ६८ तक्रारी नोंदवण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामध्ये कौटुंबिक स्वरुपाच्या तक्रारींचे प्रमाण सर्वात जास्त होते. लग्नानंतर वाद झाल्यास होणाऱ्या समुपदेशनासोबतच लग्नाच्या आधी, तरुण वर्गाचे विवाहपूर्व समुपदेशन करण्यावर भर देणं आवश्यक आहे. येत्या काळात राज्य महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन केंद्राबाबत पुढाकाराने काम करणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा