Dhule Mohadi Valmik Colony 70 Year Old Woman was Killed; काही वर्षांपूर्वी लेक सोडून गेला, कमावणारं कुणी नाही, आई बाहेर मागून खायची, घरात घुसून वृद्ध महिलेला संपवलं; महाराष्ट्र हादरला
Dhule Mohadi Valmik Colony 70 Year Old Woman was Killed; काही वर्षांपूर्वी लेक सोडून गेला, कमावणारं कुणी नाही, आई बाहेर मागून खायची, घरात घुसून वृद्ध महिलेला संपवलं; महाराष्ट्र हादरला
Dhule Mohadi Woman Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, धुळे जिह्यातील मोहाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
धुळे मोहाडी वृद्ध महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील वाल्मिक वसाहतीत एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या वृद्धेचं तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ही वृद्ध महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होती. लिलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय 70) असं मृत वृद्ध महिलेचं नाव आहे. त्या वाल्मीक वसाहतीत एकट्याच राहत होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर त्यांच्या घरातील गॅस सिलिंडर आणि इतर वस्तूंची चोरी झाल्याचंही आढळून आलं आहे.
काही वर्षांपूर्वी मुलाची आत्महत्या
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाबाईंच्या मुलाने देखील काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्यामुळे त्या घरात एकट्याच होत्या. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असून, लवकरच आरोपींना जेरबंद केलं जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
धुळे शहरातील मोहाडी उपनगरात 70 वर्षीय वृद्ध महिलेची झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज स्वतः घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासाची सविस्तर माहिती जाणून घेतली. या भेटीनंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
घटनास्थळावरून परतल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. ‘ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून, याचा मी तीव्र निषेध करतो,’ असं ते म्हणाले. त्यांनी पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीने सखोल आणि निःपक्षपाती चौकशी करून गुन्हेगारांना अटक करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील पालकमंत्री रावल यांनी दिली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा