Dhule Miscreants who were Harassing Girls were Parade in front of the College; कॉलेज परिसरात सतत मुलींची छेड, पळवून नेण्याची धमकी, तक्रार करुनही टवाळखोरांनी नको ते केलं; अखेर पोलिसांनी…
Dhule Miscreants who were Harassing Girls were Parade in front of the College; कॉलेज परिसरात सतत मुलींची छेड, पळवून नेण्याची धमकी, तक्रार करुनही टवाळखोरांनी नको ते केलं; अखेर पोलिसांनी…
Dhule Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळ्यामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण धुळ्यात खळबळ उडाली आहे.
धुळे मुलींची छेड काढणाऱ्यांची कॉलेजसमोर धिंड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश पिंपळनेर पोलीस प्रशासनाने काल कृतीतून दिला. मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा टवाळखोरांची काल बसस्थानक ते महाविद्यालय परिसरात धिंड काढण्यात आली.
अल्पवयीन मुलीकडून तक्रार
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे मुलींची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही पुन्हा दुसऱ्यांदा छेडखानीचा प्रकार घडला. इतकेच नव्हे तर मुलीला पळवून नेण्याची धमकी देण्यात आली. शिवाय एका टवाळखोराला नागरिकांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले होते, तो देखील पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाला होता. यामुळे समाजात संतापाची लाट उसळली होती. जनभावना उसळल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. त्यानंतर काल सकाळी पोलीस बंदोबस्तात विशाल भामरे आणि सुधीर पवार या दोघा टवाळखोरांची धिंड काढून महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
बस स्टॅण्ड, मुख्य चौक, कॉलेज परिसर अशा वर्दळीच्या भागातून ही धिंड काढण्यात आली. यावेळी महिलांचा सन्मान करा असा संदेश देण्यात आला. अनेक नागरिक, विद्यार्थी व महिला वर्गाने या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केलं. याप्रसंगी एपीआय किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे, भूषण शेवाळे, संदीप संसारे, पो.कॉ. रविंद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, योगेश महाले, प्रविण धनगर, दिनेश माळी आदी उपस्थित होते. दरम्यान, या कारवाईमुळे एकीकडे आरोपींना कठोर धडा मिळाला असताना, दुसरीकडे समाजातील विकृत प्रवृत्तींसाठी हा कडक इशारा ठरला आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन मुलींमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून, तक्रार करण्याचे धैर्य निर्माण झालं आहे.
“आती क्या गाडी पे, छोड देता हूं”, अशी शेरेबाजी करून शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या 19 वर्षीय संशयितावर सातपूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा