Headlines

Deaf and Mute Delivery Boy Wins Hearts With His Dedication in Pune Video Viral | पुण्यात लिफ्टची परवानगी नाकारली, तरी जिना चढून पोहोचवलं पार्सल, दिव्यांग तरुणाचा व्हिडीओ व्हायरल


Inspirational Viral Video: पुण्यातील एका मूकबधिर फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याने प्रतिकूल परिस्थितीतही कोणतीही तक्रार न करता आपलं काम प्रामाणिकपणे पूर्ण केलं. या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

Disabled Delivery Boy
(फोटो सौजन्य – ajaypalrathore_vicky/Instagram)
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात, ज्यांचे हात, पाय, डोळे आणि शरीर पूर्णपणे सक्षम असते. तरीही ते कोणतेही काम करण्यास टाळाटाळ करतात. विविध कारणं सांगत दुसऱ्यांच्या जीवावर आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, दुसरीकडे प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने काम करणारी माणसं समाजात आहेत. अशाच एका दिव्यांग फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा प्रेरणादायी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील या तरुणाला बोलता आणि ऐकता येत नाही. तरीही तो आपल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, इमारतीतील वॉचमनने त्याला लिफ्ट वापरण्याची परवानगी दिली नाही. तरीही त्याने हार न मानता जिना चढून संबंधित मजल्यावर पोहोचत हसतमुखाने ग्राहकाला फूड पार्सल दिलं. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

तक्रार न करता केलं काम

​ ​

हा व्हिडीओ अजयपाल राठोड यांनी त्यांच्या ajaypalrathore_vicky या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते सांगतात की, फूड ऑर्डर केल्यानंतर पार्सल घेण्यासाठी खाली गेले असता डिलिव्हरी पार्टनर मूकबधिर असल्याचं सुरक्षा रक्षकाने सांगितलं. रात्री उशिराची वेळ असल्यामुळे सोसायटीच्या नियमांनुसार त्याला लिफ्ट वापरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याने जिना चढून पार्सल पोहोचवलं.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डिलिव्हरी कर्मचारी इतर डिलिव्हरी पार्टनर्सप्रमाणेच पुण्याच्या वाहतुकीतून मार्ग काढत योग्य पत्ता शोधून ग्राहकापर्यंत पोहोचला. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर त्रास जाणवत नव्हता. उलट बोलता किंवा ऐकता येत नसतानाही त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि त्याने कोणतीही तक्रार न करता आपलं काम पूर्ण केलं. मोबाईलमधील अ‍ॅपच्या मदतीने त्यांनी या कर्मचाऱ्याचे आभार मानले. त्यांना या व्यक्तीशी अधिक संवाद साधण्याची इच्छा होती. मात्र, तो व्यस्त असल्यामुळे ते शक्य झालं नाही. भविष्यात पुन्हा त्याची भेट व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

नेटकरी करत आहेत कौतुक

नेटकरी करत आहेत कौतुक

हा व्हिडीओ २१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत त्या दिव्यांग कर्मचाऱ्याचं कौतुक केलं आहे. कोणी म्हणतंय, “अशा लोकांकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळते,” तर काहींनी हातपाय धड असतानाही भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांवर टीका केली आहे.

या व्हिडीओच्या शेवटी अजयपाल राठोड म्हणतात, “आपल्याकडे सर्व इंद्रिये व्यवस्थित आहेत, तरीही आपण अनेकदा कारणं शोधत बसतो. मात्र हा तरुण कोणतीही सबब न सांगता आपलं कर्तव्य पार पाडत आहे. खरा सन्मान अशाच लोकांचा व्हायला हवा.”

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा