Headlines

Congress prithviraj chavan shocking claim about sharad pawar ncp mp meeting with pm narendra modi; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? दिल्लीतील जुन्या मित्रांचा दाखला देत पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट


नागपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. “गुप्त होणाऱ्या भेटीगाठी कोणाला कळत नाहीत, उघड भेटीगाठी कळतात. सत्तापक्षातील आमचे जुने मित्र सांगतात की, उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, तसा राष्ट्रवादीही फोडणार,” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “राजकारणात एखादी घटना घडते तेव्हा त्यामागे काहीतरी वेगळा संदर्भ असतो. कोण कोणाला भेटत आहे, कशासाठी भेटत आहे, याबाबत वेगवेगळी कारणे सांगितली जातात. मात्र त्या भेटीचा खरा अजेंडा काय आहे, हे त्यांनाच माहिती असते. काही भेटी उघडपणे होतात, तर अनेक भेटी गुप्तपणे होतात आणि त्याची माहिती बाहेर येत नाही. सत्तापक्षातील आमचे जुने मित्र सांगतात की, आम्ही उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, आता राष्ट्रवादी फोडणार,” असा दावा चव्हाण यांनी केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रत्यक्षात अशी फूट पडेल का, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री असताना अशा बऱ्याच गुप्त भेटी व्हायचा, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याबाबत चव्हाण म्हणाले की, ” शरद पवार गटात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यांचा अजेंडा त्यांनाच माहिती आहे. यापूर्वी झालेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरच्या भेटीबाबतही वेगवेगळी कारणे सांगण्यात आली होती. त्यामुळे आताच्या भेटीचा नेमका अजेंडा काय आहे, हे त्यांनाच माहिती असेल,” असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, इंडिया आघाडी भक्कम असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली मते एकत्रित करणे गरजेचे आहे. विरोधकांच्या मतांचे विभाजन झाल्याचा फायदा भाजपला अनेकदा झाला आहे, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवरही चव्हाण यांनी भाष्य केले. त्यांच्या मतदारसंघात अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवली गेल्याचा आरोप त्यांनी केला. पाच मतदारसंघांमध्ये अनेक समान मतदार असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. एसआयआर प्रक्रियेनंतर काही बोगस नावे कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याबाबतही भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नेमके कोणते आश्वासन दिले, याची माहिती आपल्याला नसल्याचे सांगत, सरकार आणि जरांगे यांच्यात नेमका काय करार किंवा आश्वासन झाले, ते जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत