Manoj Muntashir On AR Rahman : सुप्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – गायक आणि लेखक मनोज मुंतशीर यांनी अलीकडेच एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, मनोज यांनी सांगितलं की, एआर रहमान यांना बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झालंय. मनोज यांनी एआर रहमान यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, कदाचित इंडस्ट्रीतील लोकांशी चांगले संबंध नसल्यामुळे त्यांना काम मिळत नसेल.
एआर रहमानबद्दल काय म्हणाले मनोज?
एका मुलाखतीत मनोज मुंतशीर म्हणाले की, ‘जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार झाले, जेव्हा एक मुस्लिम व्यक्ती देशाचे राष्ट्रपती बनले, जेव्हा एआर. रहमान यांच्यासारखी एक महान व्यक्ती, ज्यांची आपली धार्मिक ओळख असूनही या देशात त्यांच्यापेक्षा मोठं नाव नाही, तेव्हा त्यांनी ‘मीच का?’ किंवा ‘मुस्लिमच का?’ असं का विचारलं नाही? आज जर तुम्हाला काम मिळत नसेल तर त्यामागचं दुसरं कारण शोधायला पाहिजे.
Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा
‘तुमचे बॉलिवूडमध्ये चांगले संबंध नाहीत, किंवा तुमची गाणी तितकी लोकप्रिय नाहीत. अनेक कारणं असू शकतात. जेव्हा कधी मी त्यांना भेटेन, तेव्हा मी त्याला ते नक्कीच विचारेन. तो खूप छान बोलतो. मला एआर. रहमान यांना भेटून विचारायला आवडेल. मी त्यांच्यासोबत ‘मैदन’ नावाचा एक चित्रपट केला होता. त्यातील सर्व गाणी अप्रतिम होती. त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप छान होता.’
Ajit Vachani : अभिनेत्यानं बॉलिवूड गाजवलं, शाहीर साबळेंच्या लेकीसोबत लग्न; वयाच्या 52व्या वर्षी निधन, मुलगी आहे लोकप्रिय अभिनेत्री विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्या एआर रहमान यांच्या वक्तव्यावर मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज म्हणाले, ‘त्या सिनेमासाठी होकार द्यायचा नव्हता. असं नाही की चित्रपट बनवण्यापूर्वी तुम्हाला पटकथा ऐकवली नव्हती. तुम्ही अचानक संगीत द्यायला सुरुवात केली. तुम्ही पटकथा वाचली असेलच, बरोबर? त्यामुळे, जर तो एक प्रोपगेंडा होता, तर तुम्ही तो सिनेमा करायला नको होता. चित्रपट बनवल्यानंतर त्याला प्रोपगंडा म्हणण्याचं कारण मला समजत नाही.’ शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज मुंतशीर बोलत होते.
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत एआर रहमान ‘छावा’ सिनेमाबद्दल म्हणाले की, ‘हा चित्रपट समाजाला विभागणारा म्हणजेच समाजात फूट पाडणारा आहे. मला वाटतं की, या चित्रपटानं त्याचाचा फायदा उठवला. परंतु, या चित्रपटाचा मूळ उद्देश शौर्य दाखवणं हा होता. मी स्वतः दिग्दर्शकाला विचारलं होतं की, या चित्रपटासाठी तुम्हाला माझी गरज का आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त तुम्हीच हे करू शकता. चित्रपटांमुळं लोक प्रभावित होतात का? लोकांकडं स्वतःची सदसद्विवेकबुद्धी असते, त्यांना सत्य आणि अजेंडा यातील फरक समजतो.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा