दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?| Maharashtra Times
Purandar International Airport: प्रस्तावित पुरंदर विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या मार्गासाठी प्रयत्न सुरू केला आहे. दिवे घाटत रस्ते आणि मेट्रोसाठी दुहेरी बोगद्यांचा विचार सुरू आहे. म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे कमी वेळेत जाता यावे, यासाठी दिवे घाटात दुहेरी बोगदे (ट्विन टनेल) तयार करण्याचा प्रयत्न असून, त्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चा केली…
