Headlines

Parth Pawar Praful Patel both NCP Leaders interested in ministerial post at Central Cabinet Expansion;केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, पार्थ पवार-प्रफुल पटेल दोघंही उत्सुक असल्याची चर्चा


Cabinet Expansion : प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार या दोघांनाही केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळवण्यात रस आहे, परंतु या मुद्द्यावर पक्षात एकमत होत नसल्याची माहिती आहे.

Praful Patel Parth Pawar Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेल्या दोन गटांच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घेतलेल्या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार या दोघांनाही मंत्रिपद मिळवण्यात रस आहे, परंतु या मुद्द्यावर पक्षात एकमत होत नसल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीतही पुन्हा दोन गट

अलिकडच्या काळात, एका बाजूला सुनेत्रा पवार व पार्थ आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल पटेल व सुनील तटकरे असे मतभेद स्पष्टपणे दिसून आले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कामकाजावर पार्थ पवाराची पकड घट्ट होत असल्यामुळे पक्षातील अनेक जण नाराज असल्याचेही बोलले जात आहे.

पार्थ-फडणवीस भेट

पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले. “पार्थ हे आमच्या पक्षाचे युवा नेते आहेत आणि ते राज्यसभेत राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात मला काहीही गैर वाटत नाही” असे ते म्हणाले होते.

उपाध्यक्षांचं सुनेत्रा पवारांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी १३ जुलै रोजी सुनेत्रा पवारांना लिहिलेले एक पत्र शुक्रवारी समोर आले. त्यातून पक्षांतर्गत असलेली फूट उघड झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान पार्थ पवार यांचा समावेश करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करावी, अशी मागमी आहेर यांनी सुनेत्रा पवारांना केली. पार्थ यांची राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशाने पक्षातीलच काही लोक त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहेर यांनी केला.

Anjali Damania On Thackeray Brothers | ‘ही दोन माणसं घरात बसून पाठिंबा देतात’

‘पार्थ पवारांबद्दल गैरसमज पसरवलेत’

या पत्रात म्हटले आहे की, “दुर्दैवाने आपल्याच पक्षातील काही व्यक्तींकडून असे गैरसमज पसरवले जात आहेत की, पार्थ दादा पक्ष किंवा जनता यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. हे एक उघड गुपित आहे. केवळ ३८ वर्षे वय असलेल्या नेत्याबद्दल असे गैरसमज पसरवणे आणि त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु होण्याआधीच ती संपवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.” असेही पुढे म्हटले आहे

“पार्थ यांच्यात राजकीय परिपक्वतेचा अभाव आहे, अशी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले.” असा दावाही अहेर यांनी पत्रातून केला आहे.
Maharashtra TimesSanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिक जॅम, मुंबईत बंगला द्या; उपमहापौरांच्या मागणीवर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया

विलिनीकरणाच्या चर्चा सुरु

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीएतील घटकपक्षांशी जवळीक वाढत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. विलीनीकरणाबाबतच्या अशा कोणत्याही बैठका झाल्याचे यापूर्वी नाकारणाऱ्या तटकरेंनी अलिकडेच आपली भूमिका बदलली असून, आपल्याला या चर्चेची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा