7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून पाशवी लैंगिक अत्याचार केला आहे. या घृणास्पद प्रकारानंतर संपूर्ण परिसरात संतापाची मोठी लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलिस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित ७…
