![]()
पारंपरिक पिकांना छेद देत नवनवीन प्रयोग करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील विवरा (ता. पातूर) येथील प्रगतशील शेतकरी देविदास धोत्रे आणि त्यांच्या पत्नी वंदना धोत्रे यांनी सेंद्रिय शेतीत अभिनव यश मिळवले आहे. धोत्रे दांपत्याने द्राक्षाच्या घडासारख्या दिसणाऱ्या “चेरी टोमॅटो’चा यशस्वी प्रयोग केला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ते 10 गुंठे क्षेत्रात पीक घेऊन चांगला नफा मिळवत आहेत. धोत्रे दांपत्य आपल्या चार एकर शेतीत 100% सेंद्रिय आणि प्रमाणित भाजीपाला पिकवतात. चेरी टोमॅटोसाठी त्यांनी कडक आणि लांबट-गोल जातीच्या बियाण्यांची लागवड केली आहे. पिकवलेला माल मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अकोल्यातील गौरक्षण परिसरात ‘फॅमिली फार्मर’ ही संकल्पना रुजवली आहे. आठवड्यातून दोन दिवस (गुरुवार व रविवार) सकाळी 6 ते 9:30 या वेळेत थेट विक्री केली जाते. साधारण टोमॅटोला जेव्हा बाजारात 30 रुपये भाव असतो, तेव्हा चेरी टोमॅटो थेट 50 ते 60 रुपये किलोने विकला जातो. “शिक्षणात शिकलेले ‘रिकाम्या जागी योग्य शब्द भरा’ हा प्रयोग आम्ही शेतात उतरवले आहे,” असे धोत्रे साहेब अभिमानाने सांगतात. शेताच्या बांधावर त्यांनी शेवगा, सीताफळ, पुदिना आणि गवती चहाची लागवड केली आहे. शेवग्याची पाने सोलर ड्रायरवर वाळवून त्याची पावडर बनवून विक्री केली जाते. या उल्लेखनीय कार्याबद्दल वंदना धोत्रे यांना “जिल्हामाता कृषी भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 10 गुंठे चेरी टोमॅटोचे अर्थकारण 10 गुंठ्यांत मिश्र सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या चेरी टोमॅटोचा कालावधी साडेतीन ते चार महिने असून, लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी तोडणी सुरू होते. यातून 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते. किलोला 50 ते 60 रुपये दर मिळाल्यास एकूण उलाढाल 1 ते 1.50 लाख रुपये होते. प्रत्यक्ष निव्वळ नफा मात्र उत्पादन खर्च आणि बाजारभावानुसार बदलतो. शेतकरी मोबाइल नंबर : 9423849731
Source link
प्रगतिशील शेतकरी:केवळ 10 गुंठ्यामध्ये सेंद्रिय शेतीतून साडेतीन ते चार महिन्यात एक लाख रुपयांचे उत्पन्न, वंदना धोत्रे यांचा सेंद्रिय शेतीचा अभिनव प्रयोग
