Weather Update News Temprature July was the Hottest Month of the Year; यंदाचा जुलै सर्वाधिक उष्ण, चढ्या तापमानासह अतिवृष्टी, पूर, वणव्यांचा तडाखा; कारण काय?
Weather Update News Temprature July was the Hottest Month of the Year; यंदाचा जुलै सर्वाधिक उष्ण, चढ्या तापमानासह अतिवृष्टी, पूर, वणव्यांचा तडाखा; कारण काय?
Weather News : ध्रुवीय प्रदेश वगळता जगातील महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमानही जुलैमध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याची माहिती जागतिक हवामान संघटनेने दिली.
जुलै महिन्यात सर्वाधिक तापमान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जगभरात टोकाच्या हवामान घटनांची तीव्रता वाढत असून, उत्तर गोलार्धातील अनेक देशांना जुलैमध्ये तीव्र उष्णता, दुष्काळ आणि भीषण वणव्यांचा सामना करावा लागला. त्याचवेळी काही भागांत अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठी जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर जुलै २०२६ हा जुलै २०२४सोबत संयुक्तपणे जगातील सर्वाधिक उष्ण जुलै महिना ठरल्याची माहिती अमेरिकेच्या ‘यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉसफिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ने दिली आहे.
‘सर्वाधिक उष्ण जुलै महिने’
उपलब्ध नोंदीनुसार, १८५०पासूनच्या तापमानाचा विचार करता, जुलै २०२६ आणि जुलै २०२४ हे आतापर्यंतचे ‘सर्वाधिक उष्ण जुलै महिने’ ठरण्याची शक्यता आहे. ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नुसार, जुलै २०२६ हा आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण जुलै ठरला. या महिन्यातील भूपृष्ठाचे जागतिक सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील, म्हणजे १८५० ते १९०० या कालखंडातील सरासरीपेक्षा १.४७ अंश सेल्सिअसने अधिक होते. ध्रुवीय प्रदेश वगळता जगातील महासागरांच्या पृष्ठभागाचे तापमानही जुलैमध्ये आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याची माहिती जागतिक हवामान संघटनेने दिली. उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या तीनही खंडांसाठी यंदाचा जुलै सर्वाधिक उष्ण ठरला. विशेष म्हणजे, आतापर्यंतचे दहा सर्वाधिक उष्ण जुलै महिने २०१६नंतरचे आहेत. २०२३ ते २०२६ या सलग चार वर्षांतील जुलै महिन्यांनी सर्वाधिक उष्णतेच्या क्रमवारीत पहिल्या चार क्रमांकांत स्थान मिळवले आहे.
पश्चिम युरोपमध्ये जून-जुलै हा आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण कालावधीठरला. काही देशांना मे महिन्यापासून चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेसोबत जमिनीतील ओलावा अत्यल्प राहिल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली असून, त्याचा फटका शेती, नद्या, वाहतूक, ऊर्जा आणि परिसंस्थांना बसत आहे. फ्रान्स, स्पेन, जर्मनीचे काही भाग आणि ब्रिटनमध्ये पाऊस व जमिनीतील ओलावा कमी राहिला. त्यामुळे सीन, ऱ्हाइन आणि डॅन्यूब नद्यांमधील पाण्याची पातळीही सरासरीपेक्षा खाली गेली. जपान आणि दक्षिण कोरियासह आशियातील अनेक भागांत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही विक्रमी उष्णता नोंदवण्यात आली.
उष्णतेसोबत विवध भागांत अतिवृष्टीने हाहाकार माजवला. भारतात मोसमी पुरामुळे अनेकांचा मृत्यू झाला. मध्य, उत्तर-पश्चिम भारतात अतिवृष्टी, तर हिमालयीन भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. बांगलादेश, अफगाणिस्तान, किर्गिझस्तान, चीनमध्येही पूर आला. उत्तर गोलार्धात दीर्घकाळच्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे उष्ण व कोरडे, तर कमी दाबामुळे थंड व दमट वातावरण निर्माण होते. यामुळे अनेक आठवडे उष्णता, कोरडेपणा कायम राहतो. परिणामी उष्णतेच्या लाटा, दुष्काळ अतिवृष्टी, पूर आणि वणवे अशा परस्परविरोधी हवामान घटनांची तीव्रता वाढल्याचे दिसते.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा