Mumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनातील कथित अनियमितता, मोबदल्यातील विसंगती, नैसर्गिक जलमार्ग बुजविणे, स्थानिकांना रोजगार न देणे आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नगरसेवक मढवी यांनी केला.

प्रशासन आणि नॅशनल हाय स्पीड रेल कॉपोर्रेशन लिमिटेडवर टीकास्त्र सोडताना ठाणे जिल्ह्यातील भूसंपादनाची सुनावणी ठाण्यात न घेता नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यात घेण्यात आली. त्यामुळे दिव्यातील शेतकऱ्यांना राज्यभर फिरवून मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना आजही न्याय्य मोबदला मिळालेला नाही. काही ठिकाणी महिलांच्या नावावरील मालमत्ता पाडण्यात आल्या. मात्र त्यांना नुकसानभरपाईच मिळाली नाही. एका मालकाच्या दोन घरांपैकी एका घराचाच मोबदला देण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
Thane Crime : फेसबुकवरुन ओळख, प्रेमसंबंधात चारित्र्यावर सतत संशय, ठाण्याच्या लॉजमध्ये गर्लफ्रेंडला संपवलं; कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन बघताच थरारक दृश्य
अन्यथा पूरपरिस्थिती उध्दभवणार
बेतवडे गावाकडे जाणारा मूळ रस्ता बंद करून नागरिकांसाठी अरुंद मार्ग ठेवण्यात आला आहे. भविष्यात २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास गावांना मोठा धोका निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, याबाबत ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे महापालिका, बुलेट ट्रेन प्राधिकरण आणि शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने बोलावून भूसंपादन, नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची मागणी मढवी यांनीकेली. या मुद्द्यावर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका साक्षी मढवी, अर्चना पाटील आणि दर्शना म्हात्रे यांनी देखील आवाज उठवत प्रकल्पातील त्रुटी निदर्शनात आणल्या.
नगरसेवक विकास रेपाळे यांनी वृक्ष छाटणीच्या कामातील अनागोंदीवर बोट ठेवले. निविदा प्रक्रियेत झालेला विलंब, अपुरे मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव तसेच सार्वजनिक वृक्षांऐवजी खासगी जागा आणि बिल्डरांच्या परिसरातील वृक्षछाटणीला प्राधान्य दिल्यामुळे प्रभागातील धोकादायक वृक्षांची छाटणी वेळेत झाली नाही. या निष्काळजीपणामुळेच पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. रेपाळे यांनी शहरात पडत असलेल्या वृक्ष पडझडीवरून आक्रमक पवित्रा घेतला. नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या त्रुटींवर बोट ठेवत प्रशासनाला धारेवर धरले.
Badlapur Crime : दिव्यांग असल्यामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला
नैसर्गिक नाले बुजवले
या प्रकल्पासाठी देसाई खाडी, म्हातार्डी, बेतवडे आणि आगासन परिसरातील नैसर्गिक खाड्या व नाले बुजविल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून शेती पाण्याखाली जात आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांना पेरणीही करता आली नाही. जुलैतील मुसळधार पावसात बुलेट ट्रेनच्या कामासाठी उभारलेला पूल वाहून गेला. मात्र त्याचे अवशेष हटविले नसल्याने मच्छिमार व बोटींनी प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला

