Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : बहीण-भावाच्या पवित्र अशा नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. एका 25 वर्षीय नराधम तरुणाने आपल्याच 13 वर्षांच्या अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपी नराधम भावाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांनंतर मुलीचं अचानक पोट दुखू लागल्यानं तिच्या आईने तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेलं. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचं निदान झालं, ज्यामुळे तिच्या आईसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घाबरलेल्या आईने मुलीला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने चुलत भावाने तिच्यावर केलेल्या अत्याचाराची सर्व कहाणी कथन केली.
सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
भावाचा हा संतापजनक प्रताप ऐकून हादरलेल्या कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण म्हणजेच पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत. Badlapur Crime : दिव्यांग असल्यामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला (टीप : पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं व आरोपी तिचा चुलत भाऊ असल्यानं, कायद्यानुसार पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यासाठी आरोपीचं नाव प्रसिद्ध केलेलं नाही.)
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा