Headlines

Thane Jambhali Naka Hotel Maharaja Lodge Girlfriend Killed Accused Boyfriend Nandkishor Gadekar Arrested Within Two Hours; तो डोंबिवलीचा, ती भांडुपची; चार वर्ष आकंठ प्रेमात, संशयानं डोक्यात घर केलं, ठाण्याच्या महाराजा लॉजमध्ये तरुणीसोबत काय घडलं?


Thane Maharaja Hotel Lodge Girlfriend Killed CCTV Video : लॉजवरच तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर नंदकिशोर घाबरला नाही. तो लॉजमधून बाहेर पडला. तो खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून गेला.

Thane Maharaja Hotel Lodge Girlfriend Killed CCTV Video
ठाणे महाराजा हॉटेल लॉज खून सीसीटीव्ही(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : तरुण डोंबिवलीचा आणि तरुणी भांडुपची. दोघं गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकठं बुडालेले होते. विशेष म्हणजे दोघांची फेसबुकच्या माध्यमातूनच ओळख झाली होती. दररोज बोलणं व्हायचं, कधीकधी भेटणंही व्हायचं. कधी आपुलकीनं बोलायचे तर कधी भांडणं व्हायची. दोघं भेटण्यासाठी लॉजवर जायचे. काल मंगळवारी ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जांभळी नाका येथील महाराजा हॉटेल लॉज इथे दोघेजण आले होते. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. त्याचवेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि इथेच प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाला.

तरुणी निपचित पडलेली

मयत 23 वर्षीय गर्लफ्रेंड भांडुपमध्ये राहायची, तर आरोपी बॉयफ्रेंड नंदकिशोर गाडेकर हा 27 वर्षाचा तरुण डोंबिवलीच्या विष्णूनगरमध्ये राहायचा. काल मंगळावरी दोघांमध्ये भांडणं झाली अन् आरोपी नंदकिशोरने उशीच्या सहाय्याने आपल्याच गर्लफ्रेंडचं तोंड दाबलं अन् तिला संपवलं. लॉजवरच तिचा मृत्यू झाल्यानंतर नंदकिशोर घाबरला नाही. तो लॉजमधून बाहेर पडला. तो खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून गेला. आरोपी एकटाच बाहेर पडल्यानं लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता तरुणी निपचित पडलेली दिसून आली. हत्येचा हा प्रकार सायंकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रेयसीचं इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Maharashtra TimesKalyan Crime : चल आम्ही तयार आहोत समलिंगी संबंधांना! रमेशला जंगलात बोलावलं, राजेश-प्रथमेशचा वेगळाच गेम, कल्याणमधील खुनाचा उलगडा

दोन तासात पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

लॉजवरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ ठाणे नगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत केवळ दोन तासात ठाण्यातील तलावपाळी परिसरातून नंदकिशोर याला ताब्यात घेतलं. या हत्येप्रकरणी आज बुधवारी पहाटे आरोपीविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि मृत तरुणीची फेसबूकवरुन ओळख झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेमकी ही हत्या कोणत्या कारणावरुन झालीय? या हत्येच्या कारणाचा पोलिस कसू शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Maharashtra Timesचुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शेतात संतापजनक कृत्य; गरोदर राहिल्यानं पाप उघड

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा