Headlines

Buldhana News: बँक तुमच्या बापाची आहे का? शेतकऱ्याला उद्धट वागणूक; ‘स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षांनी बँक मॅनेजरला धारेवर धरलं – swabhimani shetkari sanghatana district president slapped khamgaon bank manager over insult farmer


Swabhimani Leader Slap Bank Manager Video Viral: बँक व्यवस्थापकास मारहाण होत असल्याचा २९ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

buldhana famrer
बुलढाणा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: कर्जमाफीची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला ‘बँक तुमच्या बापाची आहे काय?’ म्हणत उद्धट वागणूक दिली. यावरून संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात भडकावल्या. खामगाव शहरात बँक अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खामगाव शाखेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व कार्यकर्त्यांनी दुपारी दोन-अडीचच्या सुमारास धडक दिली. कर्जमाफीच्या मुद्यावरून शाखा व्यवस्थापक शिवाजी कड व पाटील यांच्यात वाद झाला.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या उद्धट वागणुकीबद्दल जाब विचारत अमोल पाटील यांनी कड यांच्या कानशिलात दोन चापटा लगावल्या. तर मध्यस्थी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखातही एक चापट पाटील यांनी भडकावत संताप व्यक्त केला. काही जणांनी मध्यस्थी करीत पाटील यांना बँकेबाहेर नेले. हे प्रकरण पोलिसांत गेले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Maharashtra TimesRaksha Khadse: रक्षा खडसेंवर वादग्रस्त वक्तव्य; भाजप नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ, एकनाथ खडसे आक्रमक!
‘बँकेत कर्जमाफीची विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बँक व्यवस्थापक शिवाजी कड यांनी ‘तुमच्या बापाची बँक आहे का?, तुम्हाला कितीवेळेस कर्ज सवलत द्यायची’, असे बोलल्याने त्यांना चोप दिला. आता भाषा सुधारली नाही तर स्वाभिमानी स्टाइलने चोप दिला जाईल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिला आहे.

Maharashtra TimesVidarbha Rain: विदर्भाला पावसाचा तडाखा! गडचिरोली जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्ग बंद, भामरागडमध्ये सातशे जण सुरक्षितस्थळी
बँक व्यवस्थापकांनी फेटाळले आरोप
‘तसे काही झाले नाही, शेतकरी उलटसुलट विचारत होते. शेतकऱ्याकडे दोन हेक्टर जमीन आहे. त्या जमिनीवर जेवढी कर्जमुक्ती देता येत होती, ती तुम्हाला दिली आहे. मी बैठकीमध्ये होतो. पुन्हा बैठकीला जायचे असल्याने फिल्ड ऑफिसरला विचारायला सांगितले. शेतकऱ्याने लेखी मागितले, म्हणून लेखी द्यायला सांगितले. स्टेटमेंट काढून देऊन लेटरपॅडवर लिहून द्या असेही सांगितले, अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक शिवाजी कड यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा